आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या निशाण्यावर हृतिक:ईमेल वाद पुन्हा चर्चेत आल्यानंतर कंगनाने साधला हृतिकवर निशाणा, म्हणाली- 'एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील? असा प्रश्न कंगनाने हृतिकला विचारला आहे.

कंगना रनोट आणि हृतिक रोशन यांच्यातील चार वर्षे जुन्या ईमेल प्रकरणातील गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग अर्थात सीआययूकडे वर्ग करण्यात आला आहे. पुर्वी या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे होता. हृतिकच्या वतीने त्याचे वकील महेश जेठमलानी यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास पुढे न्यावा, अशी विनंती केली होती. ही बातमी समोर आल्यानंतर कंगनाने हृतिकवर निशाणा साधला आहे. एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील? असा प्रश्न तिने हृतिकला विचारला आहे. कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, 'रडण्याची कहाणी पुन्हा सुरू झाली आहे. आमच्या ब्रेकअपला आणि त्याच्या घटस्फोटाला किती वर्षे झाली, पण तो पुढे जाण्यास तयार नाही. कोणत्याही महिलेला डेट करायलाही तयार नाही.'

तिने पुढे लिहिले, 'जसे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, तो पुन्हा तेच सर्व नाटक सुरू करतो. हृतिक रोशन, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील.'

हे होते संपूर्ण प्रकरण

हृतिक रोशन याला 2013 ते 2014 दरम्यान जवळपास 100 ईमेल मिळाले होते. यावेळी त्याने स्पष्ट केले होते की, ते सर्व ईमेल कंगनाच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. याच प्रकरणात हृतिकने 2016 साली मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हे ईमेल बोगस आयडीवरून पाठवल्याचा कंगनाने दावा केला होता. कंगनाने तिचा ईमेल हॅक झाला असून तिने हृतिकला कधीही ईमेल पाठवले नसल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...