आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटले. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आले असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. सुरुवातील ठाणे, कांजूर, भांडूपमधील अनेक भागांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून दुपारपर्यंत मुंबईतील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान वीजपुरवठा खंडीत झाल्याने अभिनेत्री कंगना रनोट हिने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "मुंबईत पॉवर कट. दरम्यान महाराष्ट्र सरकार के-के-के... कंगना म्हणतेय...", अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी लिहिले- धीर धरा
पॉवर कटवर मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी लोकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिले, "संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडीत... धीर धरा... सर्व काही ठीक होईल."
अशोक पंडित यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आणि लिहिले की, "मुंबईच्या इतिहासात असे पॉवर फेल्युअरचा कधीच पाहिले नाही. ग्रिड फेल्युअर प्रशासनाच्या अपयशाचे प्रमुख लक्षण आहे," असे ते म्हणाले आहेत.
अनुपम खेर यांनी लिहिले- बत्ती गुल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.