आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराणेशाहीवरून ट्विटर वॉर:पूजा भट्टने व्हिडिओ शेअर करुन कंगनाला करुन दिली विशेष फिल्म्सने लाँच केल्याची आठवण, उत्तर देताना कंगना म्हणाली - आभारी आहे

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी या दोन्ही अभिनेत्रींमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली

घराणेशाहीवरुन अभिनेत्री कंगना रनोट आणि पूजा भट्ट यांच्यातील शाब्दिक चकमक वाढत चालली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील बड्या चित्रपट निर्मात्यांवर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. यात तिने महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचीही नावे घेतली होती.

त्याला उत्तर म्हणून पूजा भट्टने कंगनाला आठवण करून दिली की, तिला पहिला ब्रेक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्सअंतर्गत 'गँगस्टर' या चित्रपटातून मिळाला होता. विशेष म्हणजे 2006 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कंगनाला 'गँगस्टर'साठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. या सोहळ्याचा व्हिडिओ पूजाने शेअर केला आहे. व्हिडिओत कंगना पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुकेश भट्ट यांना मिठी मारतानाही दिसत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पूजाने लिहिले आहे - ‘हा व्हिडिओसुद्धा खोटा असू शकतो का? लढण्यासाठी दोघांची गरज असते. पण मी आरोप व प्रत्यारोपाच्या या गोष्टी इतरांवर सोडून देतेय. त्यापेक्षा जे खरं आहे ते मी मांडेन.’

  • कंगनाच्या टीमने त्वरित दिले उत्तर 

पूजा भट्टच्या या ट्विटला कंगना रनोटच्या टीमने तातडीने प्रत्युत्तर दिले.  कंगना रनोट टीमने लिहिले- 'कंगना त्यासाठी आभारी आहे. विशेष फिल्म्सद्वारे तिच्या करिअरची सुरुवात झाली होती. पण आऊटसाइडर्सला चांगली वागणूक मिळावी, अशी तिची इच्छा आहे.'

कंगनाच्या टीमने पुढे लिहिले की, 'एक्स बरोबर तिचे ब्रेकअप झाल्याबद्दलदेखील ती कृतज्ञ आहे, परंतु हे आदरपूर्वक केले पाहिजे असे तिचे म्हणणे आहे. पुरुषांनी चालवलेल्या या जगात तिला मिळालेले यश हे ती तिचे नशीब समजते. पण पितृसत्ता संपावी अशी तिची इच्छा आहे.'

  • बुधवारी या दोन्ही अभिनेत्रींमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली

बुधवारी पूजा भट्टने घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. पूजाने लिहिले होते, ‘घराणेशाही हा सध्याचा ज्वलंत विषय आहे. ज्या कुटुंबाने नेहमीच नव्या कलाकारांना, तंत्रज्ञांना, संगीतकारांना संधी दिली त्या कुटुंबातील व्यक्तीला घराणेशाहीबद्दल बोलायला सांगत आहेत. मी यावर फक्त हसू शकते. लोकांना सत्य स्वीकारायचे नसते पण त्याउलट काल्पनिक गोष्टींवर त्यांचा लगेच विश्वास बसतो.' 

पूजाने आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये कंगना रनोटसाठी लिहिले, 'कंगना खूप चांगली अभिनेत्री आहे. जर तिच्यात प्रतिभा नसती तर विशेष फिल्म्स बॅनरअंतर्गत गँगस्टर चित्रपटातून तिला लाँच केले नसते. अनुराग बासूने तिला शोधले. पण विशेष फिल्म्सने तिला लाँच केले. पैसा खर्च केला.’

  • कंगना म्हणाली- यामुळे चप्पल फेकण्याचा अधिकार मिळत नाही

पूजाच्या ट्विटला कंगनाच्या टीमने प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले-  कंगनाची प्रतिभा अनुराग बासू यांनी ओळखली आणि प्रत्येकाला हे माहित आहे की मुकेश भट्ट यांना कलाकारांना पैसे द्यायला आवडत नाही.

प्रतिभावान कलाकारांना मोफत उपलब्ध करून देण्याचे उपकार अनेक स्टुडिओ त्यांच्यावर करतात. त्यामुळे तुमच्या वडिलांना तिच्यावर चप्पल भिरकावण्याचा, तिला वेडी म्हणण्याचा आणि तिचा अपमान करण्याचा अधिकार नाही. दुःखद शेवट अशी घोषणादेखील त्यांनी केली होती, असे चोख उत्तर कंगनाच्या टीमने पूजा भट्टला दिले.

कंगनाच्या टीमने पुढे लिहिले की, त्यांनी (महेश भट्ट) सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यात इतके लक्ष का दिले? त्यांनी त्याच्याही शेवटावर का वक्तव्य केले? यांसारखे काही प्रश्न तू त्यांना जाऊन विचार', असा सल्लादेखील कंगनाच्या टीमने पूजा भट्टला दिला. रिपोर्ट्सनुसार, महेश भट्ट यांनी रिया चक्रवर्तीला सुशांतपासून वेगळे होण्याचा सल्ला दिला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser