आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुक्त झाली कंगना:सोशल मीडियावर लिहिले - 'विषाणुला कसे पराभूत केले हे सांगायचे आहे, पण कोविड फॅन क्लबला दुखावू नको असे मला सांगण्यात आले आहे'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 मे रोजी कंगनाचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

कोरोनाची लागण झाल्यानंतर 10 दिवसांनी अभिनेत्री कंगना रनोट हिचा कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. स्वतः कंगनाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. कोरोनाविरूद्धची लढाई मी कशी जिंकले हे मला सांगायचे आहे, पण कोविड फॅन क्लबला दुखावू नका असे मला सांगण्यात आले आहे, असे ती म्हणाली आहे.

'विषाणुचा अपमान केल्याने लोक दुखावले जातात'
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "माझी कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी विषाणूला कसे पराभूत केले त्याबद्दल मला बरेच काही सांगायचे आहे. पण मला कोविड फॅन क्लबला दुखावू नका असे सांगितले गेले आहे. होय, येथे काही लोक आहेत, जे विषाणूचा अपमान बघून दुखावले जातात. असो, शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आपणा सर्वांचे आभार," असे कंगना म्हणाली आहे.

कोरोनाची लागण झाल्याचे 8 मे रोजी सांगितले होते
कंगनाने 8 मे रोजी तिची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. तिने सोशल मीडियावर स्वत:चा फोटो शेअर करत लिहिले होते, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल कोरोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मला कल्पना नव्हती हे विषाणू माझ्या शरीरात पार्टी करत असतील. पण मी त्यांना संपवून टाकेन. आपल्यावर कोणत्याही शक्तीचा परिणाम होऊ देऊ नका. जर तुम्ही घाबरलात तर ते तुम्हाला जास्त घाबरवेल. चला या कोविडला नष्ट करून टाकुया. हा काही नाही थोड्या काळासाठी येणारा ताप आहे, ज्याकडे जास्त लक्ष दिले गेले. हरहर महादेव,' असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले होते.

इन्स्टाग्रामने डिलीट केली होती कंगनाची पोस्ट
कंगनाने कोविडला थोड्या काळासाठी येणारा ताप म्हटल्याने इन्स्टाग्रामने तिची पोस्ट डिलीट केली होती. कंगनाने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आणि सोशल मीडियावर निशाणा साधला होता. यात ती म्हणाली होती, 'इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलीट केली आहे, ज्यात मी कोरोनाला संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. कुणाच्या तरी भावना दुखावल्या. म्हणजे दहशतवादी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानभूती बाळगणारे ट्विटरवर पाहिले होते, मात्र कोविड फॅन क्लब. कमाल आहे. इन्स्टावर दोन दिवस झाले आहेत. मात्र वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त टिकू शकते.'

बातम्या आणखी आहेत...