आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री कंगना रनोटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर तिने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. तिने सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली. तिने ध्यान मुद्रेत फोटोही पोस्ट केला आहे. तिने लिहिले की, काही दिवसांपासून थकवा जाणवत होता, यामुळे हिमाचलला जाण्यापूर्वी टेस्ट करुन घेतली. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, 'गेल्या काही दिवसांपासून मला कमजोरी आणि थकवा जाणवत होता. डोळ्यांची थोडी जळजळ होत होती. यामुळे मी काल कोरोना टेस्ट केली, आज माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
पुढे तिने लिहिले की, 'मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. मला काहीच कल्पना नव्हती की, हा व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत होता. आता मला कळाले आहे की, मी त्याचा नाश करेल. कोणत्याही शक्तीला आपल्यावर वर्चस्व करु देऊ नका. तुम्ही घाबरले तर तो तुम्हाला अजून घाबरवेल. चला याला संपवूया. कोविड-19 काहीच नाही, फक्त थोड्या काळासाठीचा फ्लू आहे. हर हर महादेव'
दरम्यान देशात कोरोनाची दुसरी लाट ही भयावह होत असताना दिसत आहे. 24 तासांमध्ये देशात 4 लाख 1 हजार 228 नवीन संक्रमित आढळले. 3 लाख 19 हजार 469 बरे झाले आणि 4,191 जणांचा मृत्यू झाला. या महामारीमुळे एका दिवसात जीव गमावणाऱ्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.