आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थलायवी:थिएटरसोबतच अमेझॉन आणि नेटफ्लिक्सवर रिलीज होणार कंगना रनोटचा चित्रपट, 55 कोटी रुपयांमध्ये झाला करार

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तानुसार, या चित्रपटाचे अधिकार 55 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटचा आगामी चित्रपट थलायवी 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रनोट दिवंगत अभिनेत्री आणि मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांसोबतच दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे.

हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वृत्तानुसार, या चित्रपटाचे अधिकार 55 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

अलीकडेच, एक व्हिडिओ रिलीज करत कंगना रनोटने थिएटर मालकांना चित्रपटाला अधिक विंडो देण्याचे आवाहन केले होते. यासह तिने सांगितले होते की, तिच्या चित्रपटासाठी अनेक मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या ऑफर्स मिळत आहेत, मात्र नफ्याकडे दुर्लक्ष करत निर्मात्यांनी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

लेखक श्रीधर पिल्लई यांनी अलीकडेच ट्विट करून सांगितले होते, 'थलायवी लवकरच देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, खरं तर चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी रेकॉर्ड रेट्सच्या ऑफर मिळाल्या होत्या. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचे स्ट्रीमिंग नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत तर प्राइम व्हिडिओवर तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये केले जाईल. थलायवी लवकरच चित्रपटगृहात,' अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

ए. एल विजय दिग्दर्शित या चित्रपटात कंगनासह अरविंद स्वामी, नासर, भाग्यश्री, राज अर्जुन आणि मधु बाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2020 पासून पुढे ढकलण्यात आलेला हा चित्रपट यावर्षी 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटगृह बंद झाल्यानंतर पुन्हा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता अखेरीस 10 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...