आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगनाची आता पत्रकाराला धमकी:म्हणाली - माझ्याविरूद्ध जे लिहिले आहे त्यावर मी कोर्ट केस करेल, गुरुवारी भास्करवरही फेक बातमी पसरवल्याचा केला होता आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक दिवसापूर्वी जेव्हा दैनिक भास्करने कंगनाने शिवसेनेला मत दिल्याचा दावा खोटा ठरवला तेव्हा तिने भास्करवर फेक बातमी पसरवल्याचा आरोप केला होता.
  • कमलेश सुतार यांनीही कंगनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की, वांद्रे पश्चिम मतदारसंघामधून शिवसेनेचा कोणताही उमेदवार उभा नव्हता.

बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पंगा घेतल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिने आता आपला मोर्चा मीडियाकडे वळवला आहे. अलीकडेच आपल्या एका ट्विटमध्ये कंगनाने म्हटले होते की, तिला भाजपला मतदान करायचे होते, मात्र युती असल्याने तिला शिवसेनेला मतदान करावे लागले होते. पण, पत्रकार कमलेश सुतार यांनी तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला की, तिने ज्या विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केले तेथून शिवसेनेचा उमेदवार उभा नव्हता. पण यावरुन ती चांगलीच संतापली.

कंगनाने सुतार यांना उघडपणे धमकी देत ​​लिहिले की, "तुम्ही चुकीचे आहात. खोटी माहिती पसरवू नका. मी तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवीन आणि तुम्हाला हे कोर्टात सिद्ध करावे लागेल. या ट्रोलिंगची तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. तुम्हाला याची किंमत तुरुंगात जाऊन मोजावी लागेल," असा धमकीवजा इशारा कंगनाने सुतार यांना दिला.

त्यानंतर कंगनाने मतदानाविषयी केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण देताना लिहिले की, "मी लोकसभा निवडणुकांबद्दल बोलत होते. परंतु ते मुद्दाम विधानसभा निवडणुकीविषयी बोलत होते. काय मूर्ख आहे. पत्रकार असल्याचा दावा करतात. ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यांना न्यायालयात खेचले पाहिजे." कंगनाने पुढे म्हटले की, तिने आपल्या कुटुंबीय व कर्मचार्‍यांसमवेत मतदान केले होते आणि इच्छा नसतानाही त्यांना शिवसेनेला आपले मत द्यावे लागले होते.

  • पत्रकारानेही सुनावले खडे बोल

कंगनाच्या ट्विटवर कमलेश सुतार यांनीही तिचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी लिहिले, "आणि कंगना रनोट जी. मी एक पत्रकार आहे. ट्रोलर नाही. कृपया पत्रकारांना घाबरवण्याचा त्यांना धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकते. शुभ रात्री."

  • कंगनाचा नवा दावा - मी भांडण सुरू केले नाही

कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे, "मी भांडणारी व्यक्ती बनू शकते. पण हे सत्य नाही. माझा रेकॉर्ड असा आहे की मी कधीही कोणतेही भांडण सुरु केलेले नाही. जर कोणी हे सिद्ध केले तर मी ट्विटर सोडेल. मी कोणतेही भांडण सुरु केले नाही, मात्र ते शेवटापर्यंत नक्की नेले आहे. भगवान कृष्ण म्हणाले आहेत की जर तुम्हाला कुणी लढायला आव्हान देत असेल तर ते स्वीकारा."

  • अभिजीत गांगुली यांनी ट्विटर सोडण्याचे आवाहन केले

कंगनाचे ट्विट पाहिल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन आणि लेखक अभिषेक गांगुली यांनी तिला ट्विटर सोडण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले, "तीन दिवसांपूर्वी आपण सोनम कपूर आणि दिया मिर्झा यांना बिमबॉस म्हटले होते. पण प्रत्यक्षात त्या दोघीही तुम्हाला पाठिंबा देत होत्या. आणि बीएमसीची कारवाई चुकीची असल्याचे त्यांचे मत होते. आता कृपया सन्मानपूर्वक ट्विटर सोडा. म्हणजे देश महत्त्वाचे मुद्दे म्हणजे डॉक्टरांचा मृत्यू, स्थलांतरित कामगारांच्या अडचणी, नोकरीचे संकट आणि घसरणारा जीडीपी यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करु शकेल."

  • कंगनाचा पलटवार - मला म्युट करा

कंगनाने अभिजीत गांगुली यांना प्रत्युत्तर देताना लिहिले की, "त्या (सोनम आणि दीया) हत्येचे आरोपी ड्रग्ज घेणा-यांसाठी लढा देत होत्या. माझे माझे नाव मुद्दाम त्यामध्ये ओढले गेले होते. तथ्यांशी छेडछाड करू नका. मला म्युट करा आणि वास्तविक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा."