आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यू-ट्यूबरला कंगनाची धमकी:ध्रुव राठीवर भडकली कंगना, म्हणाली - खोटे व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला 60 लाख रुपये देण्यात आले, मी ठरवले तर त्याला तुरुंगात टाकू शकते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेक वक्तव्ये केली.

अभिनेत्री कंगना रनोट हिने यू-ट्यूबर ध्रुव राठीला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई पालिकेने तिच्या ऑफिसचे अतिक्रमण पाडले होते. त्यावरून मोठा गदारोळ उडाला. त्यावेळी अनेकांनी अनेक बातम्या केल्या. त्यात वेगवेगळे यू-ट्यूबर आघाडीवर होते. कंगनाच्या मते या यू-ट्यूबर्सना मानधन मिळत असल्यामुळेच त्यांनी माझ्याविरोधात बातम्या केल्या. यात तिने ध्रुव राठीचे नाव घेतले आहे.

कंगनाने ट्विट करताना सांगितले की, 'माझ्या घराबाबत बीएमसीने नोटीस बजावल्याची चुकीची माहीती यू-ट्यूबर्सनी दिली. ध्रुव राठीही त्यात होता. अशी बातमी देण्यासाठी त्याला 60 लाख रुपये देण्यात आले. मी ठरवले तर मी त्याला तुरुंगात टाकूच शकते.' असे ती म्हणाली

कुठून सुरु झाला हा वाद?

पत्रकार आणि फिल्ममेकर एरे कॅथेरने आरोप लावला होता की, सुशांत प्रकरणात त्याच्या कुटुंबाचा पर्दाफाश करण्यासाठी मोठ्या यूट्यूबरला 65 लाख रुपये देण्यात आले. यापूर्वीच या यूट्यूबरला कंगना रनोट आणि अर्नब गोस्वामी यांच्याविरोधात व्हिडिओ बनवण्यासाठी हायर करण्यात आले होते.

कंगनाच्या या वक्तव्यानंतर मात्र अनेक यू-ट्यूबर्स नाराज झाले आहेत. बातमी देणे आमचे काम आहे. आमची एखादी बातमी जेव्हा आम्ही देतो तेव्हा अत्यंत खात्रीलायक सोर्स त्यात असतात. कंगनाने ज्या चॅनलवर अनेक गोष्टी मांडल्या, त्या चॅनलचा काळा कारभारही लोकांसमोर आला. त्यांच्यावर अशी कारवाई होत नाही. पण आम्ही एकटे असल्यामुळे अशा पद्धतीचा धाक दाखवला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे.