आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ:कंगना रनोटला दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सौहार्द समितीकडून समन, शीख समुदायावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने शीख समुदायावर केलेल्या वक्तव्याबाबत हे समन्स जारी करण्यात आले आहे.

अभिनेत्री कंगना रनोट तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली, त्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर शेतक-यांच्या आंदोलनाची तुलना खलिस्तानी चळवळशी केली. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला होता. आप नेते राघव चढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सौहार्द समितीने कंगना रनोटला समन्स बजावले आहे. कंगनाला 6 डिसेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कंगनाने शीख समुदायावर केलेल्या वक्तव्याबाबत हे समन्स जारी करण्यात आले आहे.

यापूर्वी कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली.

कंगना नेमके काय म्हणाली होती?

कंगनाने आपल्या सोशल मीडिया स्टोरीत म्हटले होते की, 'खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडले होते. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावे लागले ते महत्त्वाचे नाही. इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडले. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशके झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे,' असे ती म्हणाली होती.

कंगनाने तिच्या आणखी एका स्टोरीत इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले होते की, 'देशात खलिस्तानी चळवळ फोफावत असताना इंदिरा गांधी यांची गोष्ट याआधी पेक्षा अधिक कालसुसंगत होत आहे. … लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणेल.'

कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तिच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर बुधवारी तिने सोशल मीडियावर तिची प्रतिक्रिया दिली.

कंगनाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या हातात वाइनच्या ग्लास दिसत असून तिने काळ्या रंगाचा स्लिट स्कर्ट परिधान केले आहे. हा फोटो शेअर करत 'आणखी एक दिवस, आणखी एक एफआयआर.. जर ते मला अटक करायला आले… तर सध्या घरी माझा मूड असाच आहे,' असे कॅप्शन कंगनाने त्या फोटोला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...