आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाचा महागडा अ‍ॅक्शन सीन:'धाकड'मधील एका अ‍ॅक्शन सीनवर खर्च होणार तब्बल 25 कोटी, दिग्दर्शकाचे कौतुक करताना कंगना म्हणाली - सीनसाठी केलेली तयारी पाहून मला आश्चर्य वाटले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवाळीत प्रदर्शित होणार आहे 'धाकड'

अभिनेत्री कंगना रनोट सध्या मध्य प्रदेशात असून येथे तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाविषयीची एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. या चित्रपटातील एका अ‍ॅक्शन सीनवर तब्बल 25 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. स्वतः कंगनाने सोशल मीडियावर रिहर्सलचा व्हिडिओ शेअर करताना हा दावा केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत कंगना म्हणतेय, ‘मी असा कोणताही दिग्दर्शक पाहिला नाही जो रिहर्सल्ससाठी इतका वेळ आणि महत्त्व देतो. चित्रपटातील सर्वात मोठा अ‍ॅक्शन सीन शूट करत आहोत. पण या सीनसाठी केलेली तयारी पाहून मला आश्चर्य वाटले. मला खूप काही शिकायला मिळत आहे. या एका अ‍ॅक्शन सीनसाठी 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जात आहे,’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दिवाळीत प्रदर्शित होणार आहे 'धाकड'

रजनीश घई दिग्दर्शित ‘धाकड’ हा चित्रपट यावर्शी दिवाळी मुहूर्तावर 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिव्या दत्ता आणि अर्जुन रामपालसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात कंगना इंटेलिजेंस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिचा आणखी एक चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलायवी असे या चित्रपटाचे नाव असून यात तिने तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका वठवली आहे.

'धाकड' नंतर कंगना 'तेजस'च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. तिने 'अपराजित अयोध्या', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर आधारित अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याशिवाय आणखी एका आगामी चित्रपट कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...