आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाने करणला केले लक्ष्य:गोव्यात शूटिंगनंतर टीमने वापरलेले पीपीई किट कच-यात फेकले, कंगना म्हणाली - चित्रपटसृष्टी आता पर्यावरणासाठीही हानीकारक आणि घातक ठरतेय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता कंगनाने करणला लक्ष्य करत चित्रपटसृष्टीत आता पर्यावरणासाठीही हानीकारक आणि घातक ठरतेय, असे म्हटले आहे.

अभिनेत्री कंगना रनोटने हिने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या टीमने गोव्यात शूटिंग केल्यानंतर तेथे झालेला कचरा साफ न करताच ती जागा सोडल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. आता कंगनाने करणला लक्ष्य करत चित्रपटसृष्टीत आता पर्यावरणासाठीही हानीकारक आणि घातक ठरतेय, असे म्हटले आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले - “चित्रपटसृष्टी केवळ देशाच्या नीतीमुल्यांसाठी किंवा संस्कारांसाठीच विषाणू ठरते असे नाही, तर आता ती पर्यावरणासाठीदेखील हानीकारक आणि घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. एका मोठ्या प्रतिष्ठित निर्मिती संस्थेने या अयोग्य, लज्जास्पद आणि बेजबाबदारपणे केलेल्या वर्तनाकडे कृपया लक्ष द्या”, असे ट्विट कंगनाने केले असून ते तिने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना टॅग देखील केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वीच धर्मा प्रोडक्शनने गोव्यातील नेरुल या गावात त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
चित्रीकरण संपल्यानंतर संपूर्ण टीम या ठिकाणाहून रवाना झाली. मात्र, सेटवर झालेला प्लास्टिक कचरा किंवा पीपीई कीटप्रमाणे अन्य कचरा त्यांनी तसाच ठेवला. या ठिकाणचा एक व्हिडिओ एका
युजरने सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर कंगनाने तो शेअर केला.

स्थानिक लोकांनी केली माफीनाम्याची मागणी

कंगनापूर्वी लोखांचो एकवॉट गोवा या स्वयंसेवी संस्थेनेही करण जोहरकडे याच विषयावर लेखी माफी मागितली होती. करणकडून प्रतिसाद न मिळाल्यास पुढील आठवड्यात ते मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील, असे स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे.

दीपिकाच्या अडचणीत वाढ

शकुन बत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर दीपिका पदुकोण याच चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर सोडून मुंबईत आली होती. मंगळवारी तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरावर तपासणी एजन्सीने छापा टाकला. तिच्या घरातून एनसीबीला ड्रग्ज मिळाले आहेत. यानंतर पुन्हा एकदा दीपिकाच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत.