आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘थलाइवी’ची कहाणी:जयललितांचे व्यक्तिमत्त्व साकारताना कंगनाने परिधान केल्या जाड साड्या!

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्लाने दिली ‘दिव्य मराठी’ला खास माहिती

मंगळवारी कंगना रनौतच्या वाढदिवशी तिच्या आगामी ‘थलाइवी’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. कंगना यात जयललितांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ती तरुण वय ते वृद्धत्वापर्यंत वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. यासाठी तिने २० किलो वजन वाढवले आहे. काही प्रयोग वेशभूषेतून केले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती वेशभूषा डिझायनर नीता लुला हिने चित्रपटामध्ये कंगनाच्या साड्या डिझाइन केल्या आहेत. यापूर्वी तिने कंगनाच्या ‘मणिकर्णिका’साठी वेशभूषादेखील डिझाइन केली होती. नीताने दिव्य मराठीसोबत विशेष बातचीतमध्ये चित्रपटाविषयी विशेष माहिती दिली. नीताने सांगितले, मला या चित्रपटासाठी खूपच रिसर्च करावे लागले. मी शूटच्या आधी आणि त्यानंतरही रिसर्च करत राहायचे. कारण जयललिता यांच्या पात्रावर जितका अभ्यास करायचो तितके त्यांचे वेगळा पैलू समोर येत होते.

पॅडिंग साडीसाठी लागले दोन दिवस
कृत्रिम पॅडिंगच्या डिटेलवर काम करण्यासाठी जवळजवळ दोन दिवस लागले. या वेळी साडीची आतून डिझायनिंग करण्यात येत होती. यात हाताची बाजू किती जाड दाखवायची किंवा खांदा किती जाड दाखवायचा, त्यात किती जाड कपडा ठेवायचा याची तयारी केली जात होती. अशा प्रकारे ती साडी आधी पुतळ्याला घालून पाहिली जायची, नंतर शूटिंगच्या वेळी कंगनाला घालावी लागायची.

तरुणपणाच्या लूकसाठी पाहिले त्यांचे चित्रपट
दुसरीकडे सडपातळ जयललितांच्या पोशाखासाठी नीताने साधी साडी आणि पोशाखाचा वापर केला. यात त्यांचे वजन फारच कमी होते. यात रिबनच्या साइजची साडी बनवण्यात आली होती. यात सर्वात जास्त साध्या जाॅर्जेटच्या साड्या वापरण्यात आल्या. त्यांचा पोशाख आणि आयडिया नीताने रिअल जयललिता यांच्या मुलाखती आणि माहितीपट पाहून घेतली. ती त्यांच्या चित्रपटातील एक-एक गाणे १५ ते २० वेळेस पाहत होती.

कडक उन्हाळ्यात घालत हाेती पॅडिंगची साडी
आमिर खानने ज्या प्रकारे “दंगल’साठी आधी वजन वाढवले, शूटिंग केले, नंतर वजन घटवले, कंगनानेही तसेच केले. नीताने सांगितले, कंगनाने आधी वजन वाढवले, कडक उन्हाळ्यात जयललितांसारखे दिसण्यासाठी पॅडिंगच्या साड्या घालून शूटिंग केले. यासाठी तिने जवळजवळ २० किलाे वजन वाढवले होते. नंतर आम्हाला जाड साड्या तयार कराव्या लागल्या. त्या घालून कंगना वजन वाढलेल्या जयललितांसारखी दिसत होती. एवढ्या गरमीत तिने त्या साड्या घातल्या.

बातम्या आणखी आहेत...