आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कटिंग एक्सपेरिमेंट:बहिणीसाठी हेअरड्रेसर बनली कंगना रनोट, रंगोली म्हणाली - ही कायमच प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार असते

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझा नवा हेअरकट कसा वाटला, असे रंगोलीने विचारले आहे.

देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिनेत्री कंगना रनोट तिच्या कुटुंबासोबत मनालीच्या घरी वेळ घालवत आहे. सध्या घरी राहून ती नवनवीन गोष्टी करत आहे. अलीकडेच ती आपल्या थोरल्या बहिणीसाठी हेअरस्टाइलिस्ट बनली. स्वतः रंगोलीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन कंगनाचे नवे रुप तिच्या चाहत्यांना दाखवले आहे. रंगोलीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात कंगना तिचे केस कापत आहे. 

रंगोलीने फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगितले, “मला बऱ्याच दिवसांपासून केस कापायचे होते. मी खरंतर मुंबईतच माझे केस कापते ते कलर करते. मात्र ही कायमच प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार असते.''  माझा नवा हेअरकट कसा वाटला, असेही रंगोलीने विचारले आहे. 

रंगोलीने तीन फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एका फोटोत कंगना तिचे केस कापत आहे, तर इतर दोन फोटोत रंगोलीने तिचा नवीन हेअरकट दाखवला आहे. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात कंगना घरी राहून नवनवीन गोष्टी शिकत आहे. अलिकडेच तिने रंगोलीच्या नवीन घराचे इंटेरिअरसुद्धा केले आहे.

काश्मिरी सरपंचांच्या मृत्यूबद्दल व्यक्त केला होता संताप

आपल्या मागील पोस्टमध्ये कंगनाने काश्मिरी सरपंच अजय पंडिता यांच्या हत्येची तीव्र शब्दांत निंदा केली होती.  8 जून रोजी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लरकीपोरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची गोळ्या घालून हत्या केली होती. अजय पंडिता यांचे समर्थन न केल्याबद्दल कंगनाने बॉलिवूड स्टार्सवर कडक टीका केली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले होते,  जिहादी अजंडा चालवणारे लोक सेक्‍युलॅर‍िझमच्या कातडीखाली लपत आहेत. कंगनाने व्हिडीओमध्ये एका कार्डबोर्डवर लिहिले होते की, 'मी हिंदुस्थान आहे. मला लाज वाटते. अजय पंडिताला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्यावर जम्मू- काश्मीर येथील अनंतनाग येथे हत्या करण्यात आली.'

कंगनाने वाजवला होता पियानो

कंगनाचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ती सुंदर शैलीत पियानो वाजवताना दिसली होती. कंगनाचा हा व्हिडीओ तिच्या टीमने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'कंगनाने लव्ह स्टोरीच्या थीमवर तिच्या मनालीच्या घरी पियानो वाजवला आहे'. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कंगना डेडिकेशनने पियानो वाजवताना दिसली. तिने वाजवलेली धून 1970 चा हॉलिवूड चित्रपट 'लव्ह स्टोरी'मधील आहे. कंगनाचे हे नवीन रुप बघून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले होते.

बातम्या आणखी आहेत...