आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

BMC विरोधात कंगनाचा संताप:तोडलेल्या ऑफिसचे 12 फोटो शेअर करुन कंगना म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार आहे, एकेकाळी जे मंदिर होते त्याला कब्रस्तान बनले'

मनालीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने 3 ट्विट करुन तिच्या तोडलेल्या ऑफिसच्या प्रत्येक भागाची 12 छायाचित्रे शेअर केली आहेत.
  • 9 सप्टेंबर रोजी पालिकेने तिच्या पाली हिल ऑफिसमधील बेकायदा बांधकाम तोडले होते.

अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईतील बीएमसीच्या कारवाईच्या 8 दिवसांनी आपल्या ऑफिसची छायाचित्रे शेअर केली आहेत. यासह तिने एकापाठोपाठ 3 ट्विटदेखील केले आहेत. 'हा माझ्या स्वप्नांचा, माझ्या आत्मविश्वासाचा, माझ्या स्वाभिमानाचा आणि माझ्या भविष्याचा हा बलात्कार आहे,' असे कंगना म्हणाली आहे.

बीएमसीने 9 सप्टेंबर रोजी कंगनाच्या पाली हिलस्थित ऑफिसमध्ये कारवाई करत तेथील बेकायदा बांधकामांवर हातोडा मारला होता. पालिकेच्या पथकाने सुमारे दोन तास जेसीबी मशीन, हातोडा आणि क्रेनच्या साहाय्याने येथे तोडफोड केली होती. त्याच दिवशी कंगना हिमाचलहून मुंबईला पोहोचली होती. मात्र, बीएमसीच्या कारवाईवर कंगनाने हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने या कारवाईवर स्टे आणला. आता या प्रकरणाची सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

पहिले ट्विट

दुसरे ट्विट

तिसरे ट्विट

  • कंगनाचे 2 कोटींचे नुकसान झाले

बीएमसीच्या कारवाईमुळे कंगनाला 2 कोटींचा तोटा झाल्याचे वृत्त आहे. कंगनाने हे तीन मजली कार्यालय तयार करण्यासाठी सुमारे 48 कोटी रुपये खर्च केले होते. 10 सप्टेंबरला कंगना एक ट्विट करुन म्हणाली होती, “माझे ऑफिस 15 जानेवारी रोजी सुरु होणार होते. मात्र त्याच काळात कोरोनाचे संकट आले, त्यामुळे आम्ही जे काही काम करायचे होते ते अर्ध्यावरच थांबवले होतं. परंतु, आता पुन्हा या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी किंवा ते उभारण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पण एक सांगते, मीच याच उद्धवस्त झालेल्या, तोडलेल्या ऑफिसमधून काम करण्यास सुरुवात करेन. हे उद्धवस्त झालेले ऑफिस एक प्रतिक आहे, जी स्त्री या जगात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते तिच्यासोबत असेच होते हे यातून सांगण्यात येतंय.”