आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री रंगना रनोटने हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेत तिच्याविरोधात वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी तिस-यांदा समन्स बजावून आज (23 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ती हजर झाली नाही. कंगना सध्या हिमाचलमध्ये आपल्या घरी आहे. आणि तिच्या वतीने तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होईल.
कंगना रनोटला मुंबई पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
कंगना आणि तिच्या बहिणीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करत दोन समुदायात द्वेष निर्माण केल्याचा आरोप आहे. कंगनाने मध्यंतरी बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावर कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 17 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी कंगनाला 26 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र भावाच्या लग्नाचे कारण देत 15 नोव्हेंबर नंतरच चौकशीसाठी हजर होणार असल्याचे कंगनाच्या वतीने सांगण्यात आले होते.
कंगनाविरोधात याचिकाकर्त्याचे हे आहेत आरोप
कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सैय्यद यांनी प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कंगना रनोेटने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडवर टीका करताना या ठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.
कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते, असा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केले आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्विट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात, असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता.
कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.