आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑफिस तोडफोडीचे प्रकरण:संजय राऊतांना हायकोर्टाकडून मुदतवाढ, कंगनाचे ट्विट- तर भिवंडीत 50 लोकांचे प्राण वाचले असते, मुंबईचे काय होणार हे देवाला माहिती…

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएमसीचा आरोप - कंगनाने अवैध बांधकाम केले, परंतु कंगनाने हा दावा फेटाळला

पाली हिल्सस्थित ऑफिसमधील तोडफोड केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनोट हिने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कोर्टाची प्रक्रिया सुरू होताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाते यांच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला आणि उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितली गेली. याचा विचार करून कोर्टाने त्यांना शुक्रवारपर्यंत उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे उच्च न्यायालय बंद होते, त्यामुळे सुनावणी झाली नव्हती. त्यावर आज सुनावणी झाली.

  • हायकोर्ट काय म्हणाले?

कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती महापालिकेने हायकोर्टात केली होती. 'तुम्ही वेळ मागता पण कारवाई मात्र लगेच करता, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेचे कान टोचले आहे.

दरम्यान, कंगना रनोटच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावरील 12 अनधिकृत बांधकाम जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्याने पाडले होते. कंगनाने 2017 मध्ये हा बंगला विकत घेतला होता. या बंगल्याच्या दुरुस्तीच्या नाववर बेकायदा अंतर्गत बदल करण्यात आले होते. हा बंगला निवासी असून त्यात बेकायदा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. दरम्यान, या तोडकामाचा खर्चही कंगनाकडून वसूल करण्यात येईल, असेही महापालिकेने म्हटले होते.

  • पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले - कंगनाचे ट्विट

भिवंडी शहरात 21 सप्टेंबर रोजी तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 41 जणांचे प्राण गेले आहेत. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितकी निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले, अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे.

अभिनेत्रीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिका जेव्हा माझ्या घराचे बांधकाम बेकायदेशीररित्या तोडत होते, त्यावेळी त्यांनी या इमारतीवर लक्ष दिले असते तर आज जवळपास 50 लोक जिवंत असते. इतके सैनिक तर पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते, जेवढे निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले. मुंबईचे काय होणार हे देवाला माहिती…”असे ट्विट कंगनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...