आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आता कंगना VS अनुराग कश्यप:कंगनाने स्वत:ला क्षत्रिय म्हटल्यावर अनुराग म्हणाले - तू एकटीच मणिकर्णिका आहे, चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर; कंगना म्हणाली- तुम्ही इतके मंदबुद्धी कसे झालात?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोट आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट सध्या सगळ्यांसोबतच पंगा घेताना दिसत आहे. राज्य सरकारवर टीका केल्यानंतर कंगनाने जया बच्चन आणि उर्मिला मातोंडकर यांच्यावर तोंडसुख घेतले. आता कंगनाने आपला मोर्चा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याकडे वळवला आहे. सध्या कंगना आणि अनुराग यांच्यात ट्विटर वॉर सुरु झालेले पाहायला मिळत आहे. अलीकडेच एका ट्विटमध्ये कंगनाने स्वतःला क्षत्रिय म्हटले. त्यावर अनुराग यांनी कंगनाला चीनवर हल्ला करण्याचा सल्ला दिला. यावर प्रत्युत्तर देताना कंगनाने अनुराग यांना मंदबुद्धी म्हटले आहे. तसं पाहता यांच्यात पहिल्यांदाच ट्विटर वॉर रंगलेले नाही. यापुर्वी दोघांत जुलै 2020 मध्ये ट्विरटवर वाद रंगला होता.

  • असे सुरु झाले दोघांत ट्विटर वॉर

कंगनाने अलीकडेच एक ट्विट करत म्हटले होते, 'मी एक क्षत्रिय आहे. एकवेळ शिर कापलं तरी चालेल, पण झुकणार नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहणार. मान, सन्मान आणि स्वाभिमानाने जगले आहे आणि गर्वाने राष्ट्रवादी म्हणून जगत राहणार. सिद्धांतासोबत कधीच तडजोड केलेली नाही, करणार नाही. जय हिंद.”

कंगनाच्या याच ट्विटवरून अनुराग कश्यप यांनी तिला चीनवर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे. 'ताई तू एकटीच मणिकर्णिका आहेस. तू चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर. बघ किती आतमध्ये घुसले आहेत. त्यांनाही दाखवून दे की, तू आहेस तोपर्यंत कुणीही देशाच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुझ्या घरापासून एक दिवसाच्या अंतरावर आहे एलएसी. जा वाघिणी. जय हिंद,” असा टोला अनुरागने कंगनाला लगावला.

शांत राहिल ती कंगना नाही. कंगनाने या ट्विटवर अनुरागला चांगलेच सुनावले. तिने चक्क अनुरागला मंदबुद्धी म्हटले आहे. अनुरागच्या ट्विटला उत्तर देताना कंगनाने लिहिले, ‘ठीक आहे, मी सीमेवर जाते आणि तुम्ही ऑलिम्पिकमध्ये भाग घ्या. देशाला सुवर्णपदक पाहिजेत. हा कोणता बी ग्रेड चित्रपट नाही जिथे कलाकार कोणतीही भूमिका साकारेल. तुम्ही इतके मंदबुद्धी कसे झालात. जेव्हा आपली मैत्री झाली होती तेव्हा तर फार हुशार होता.’

  • अडीच महिन्यांपूर्वी झाली शाब्दिक चकमक

यापूर्वी या दोघांचे अडीच महिन्यांपूर्वी जुलैमध्ये ट्विटर वॉर झाले होते. अनुरागने कंगनाच्या एका मुलाखतची क्लिप शेअर करुन म्हटले होते की, काल कंगनाची एक मुलाखत बघितली. आम्ही एकेकाळी खूप चांगले मित्र होतो. ती माझा प्रत्येक चित्रपट बघून मला प्रोत्साहन द्यायची. पण मी या नवीन कंगनाला ओळखत नाही.