आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना vs शिवसेना:कंगनावर होम क्वारंटाइनचा शिक्का, एअरपोर्टवरील घोषणाबाजी दरम्यान पोहोचली घरी, म्हणाली - उद्धव ठाकरे! आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचा अहंकार मोडेल, लक्षात असू द्या

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मुंबई करणी सेना आणि रामदास आठवले यांनीही कंगनाला सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे.

मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्याने उठलेल्या वादंगानंतर अभिनेत्री कंगना रनोट बुधवारी दुपारी 2.45 वाजता थोरली बहीण रंगोलीसह मुंबईत पोहोचली. दरम्यान मुंबई विमानतळावर बराच गोंधळ बघायला मिळाला. कंगनाचे समर्थक आणि विरोधक समोरा-समोर आले होते. कंगनाला पाठिंबा देण्यासाठी रामदास आठवले यांचे दोन डझनहून अधिक कार्यकर्ते विमानतळावर हजर होते, तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील काळे झेंडे आणि बॅनर घेऊन कंगनाला आपला विरोध दर्शवत होते. सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी व्हीआयपी गेटऐवजी कंगनाला दुस-या गेटमधून बाहेर काढण्यात आले. येथून ती थेट तिच्या घरी पोहोचली. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तिच्या घराबाहेर 50 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

 • होम क्वारंटाइनचा बसला शिक्का

मुंबई विमानतळावर बीएसीकडून कंगनाच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का लावण्यात आला आहे. यापूर्वीच मुंबईच्या महापौर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, कोरोना गाइडलाइन्सनुसार कंगनाला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन व्हावे लागेल. मात्र कंगनाने 7 दिवसांत परत जाण्याचे तिकीट दाखवले तर तिला यापासून सूट मिळेल.

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

घरी पोहोचताच कंगनाने “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. ती म्हणाली की, आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचा अहंकार मोडेल. जय महाराष्ट्र.

कंगना म्हणाली, ''उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, चित्रपट माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर तोडून मोठा सूड उगवला. तुम्ही खूप मोठे उपकार केले आहे. काश्मिरी पंडितांसोबत काय घडले असेल, हे मला माहित होते. मात्र आज मला याची जाणीव झाली आहे. आज मी तुम्हाला एक वचन देते की, मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेल. मी माझ्या देशातील लोकांना जागे करेन. ठाकरे जे क्रौर्य आणि दहशत माझ्याबाबतीत घडली आहे, त्याला नक्कीच अर्थ आहे. जय हिंद. जय भारत'', अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

कंगना मुंबई विमानतळावर दाखल झाली तेव्हाचा हा व्हिडिओ आहे.

कंगनाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस
कंगनाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस
एअरपोर्टवर कंगनाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे फील्ड मार्शल, सीआयएसएफ आणि मुंबई पोलिसांचे 24 हून अधिक जवान तैनात आहेत.
एअरपोर्टवर कंगनाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे फील्ड मार्शल, सीआयएसएफ आणि मुंबई पोलिसांचे 24 हून अधिक जवान तैनात आहेत.
 • विमानात पत्रकारांनी कंगनाशी बोलायचा प्रयत्न केला

यावेळी, विमानतळावर मीडियाची मोठी गर्दी दिसून आली. सर्वांना तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तिच्या सुरक्षारक्षकांनी माध्यमांना तिच्यापासून दूर ठेवले. विमानातही काही पत्रकारांनी कंगनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण ती संपूर्ण वेळ आपल्या सीटवरच बसून राहिली आणि पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

 • आज सकाळी मुंबईतील ऑफिसमध्ये झाली तोडफोड

बुधवारी सकाळी बेकायदा बांधकामांबाबत मुंबई महापालिकेने कंगनाच्या मुंबईस्थित कार्यालयावर हातोडा पाडला. ही कारवाई सकाळी 10.30 वाजता सुरू झाली आणि दुपारी 12.40 पर्यंत चालली. या ऑपरेशन दरम्यान, बाल्कनी आणि कार्यालयाच्या बाहेरील बाजूचे बांधकाम तोडण्यात आले आहे. यावेळी जवळपास राहणा-या काही लोकांनी या तोडफोडीला विरोधही केला होता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी तीन वाजता होईल.

 • शरद पवार म्हणाले- ही कारवाई चुकीची होती

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मुंबईत कितीतरी बेकायदा बांधकामे होत असताना ही कारवाई आवश्यक नव्हती. पालिकेने हा निर्णय का घेतला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या कारवाईमुळे कंगनाला बोलण्याची संधी मिळाली आहे. तर भाजप नेते आशिष शेलार यांनी सूडातून ही कारवाई झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की शहर नियोजनामुळे ही कारवाई झालेली नाही. आम्ही याला विरोध करतो.

 • चंडीगड विमानतळावर कंगनासाठी 'झाशीची राणी'च्या घोषणा

बुधवारी सकाळी हिमाचलच्या मंडीतील भामला येथून कडक सुरक्षेत कंगना चंडीगडला रवाना झाली आणि सकाळी अकराच्या सुमारास चंदीगड विमानतळावर पोहोचली. तत्पूर्वी, पंजाबमधील कुराली येथे पोहोचताच पंजाब पोलिसांची एक जिप्सी कंगनाच्या प्रतिक्षेत होती. या जिप्सीतून कंगना चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. यावेळी कंगना पांढ-या साडीत दिसली. चंदीगड विमानतळावर दाखल होताच उपस्थितांनी तिला 'झाशीची राणी' म्हणून संबोधित केले. अभिनेत्रीनेही हात हलवून जनतेला प्रतिसाद दिला.

कंगनाने आज सकाळी हिमाचल प्रदेशमधील मंडीहून चंदीगडपर्यंतचा प्रवास रस्त्याने केला. चंदीगडहून दुपारी 12.15 वाजेच्या फ्लाइटने ती मुंबईकडे रवाना झाली. दुपारी 2.50 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्याच्या तणावाची परिस्थिती बघता मुंबई विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कंगनासोबत तिची थोरली बहीण रंगोली चंदेल हीदेखील आहे.

 • मंडीहून चंदीगडला जाताना कंगनाने हमिरपूर जिल्ह्यातील एका मंदिरात थांबून दर्शन घेतले
 • मोहाली इंटरनॅशनल एअरपोर्टवर कंगना मुंबईकडे येण्यासाठी पोहोचली तेव्हाचा हा व्हिडिओ आहे.
 • कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह

मंगळवारी कंगनाचा कोरोना रिपोर्टचा कोणताच अहवाल आला नव्हता, यामुळे मंडीत आरोग्य विभागाला तिचे पुन्हा सँपल घ्यावे लागले. बुधवारी कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर कंगना मुंबईसाठी रवाना होऊ शकली.

कंगनाच्या मुंबईतील घरासमोर पोलिस
कंगनाच्या मुंबईतील घरासमोर पोलिस

कंगनाचे ट्विट

सामना अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना मुंबादेवीवर ट्विट केले

दरम्यान, ‘देवी’स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना कंगना ट्विटमध्ये म्हणाली, "मी 12 वर्षांची असताना हिमाचल सोडून चंडीगड हॉस्टेलला गेले आणि मग दिल्लीत राहिले. 16 व्या वर्षी जेव्हा मुंबईत आले तेव्हा काही मित्रांनी सांगितले की, मुंबईत तोच राहतो ज्याला मुंबादेवी प्रेम करते. यानंतर आम्ही सर्व मुंबादेवीच्या दर्शनाला गेलो. माझे सर्व मित्र परत गेले आणि मुंबादेवीने मला स्वतः जवळच ठेवले."

मुंबईत आल्यावर होऊ शकते क्वारंटाइन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोरोना गाइडलाइन्सनुसार कंगनाला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन व्हावे लागेल. मात्र कंगनाने 7 दिवसांत परत जाण्याचे तिकीट दाखवले तर तिला यापासून सूट मिळेल. दरम्यान तिच्या बंगल्याच्या बेकायदा बांधकामाला तोडण्याच तयारी सुरू आहे.