आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटने दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा:नोट शेअर करत म्हणाली - तुम्ही राम आणि कृष्णासारखे अमर आहात

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रनोटने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी 72 वर्षांचे झाले आहेत. कंगनाने एका इव्हेंटचा जुना फोटो शेअर करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक लांबलचक नोट शेअर केली आणि पंतप्रधान मोदींना पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती संबोधले. तिने पंतप्रधान मोदी हे भगवान राम आणि कृष्णासारखे अमर आहेत, असेही म्हटले आहे.
कंगनाने पीएम मोदींना म्हटले अमर
फोटो शेअर करत कंगनाने लिहिले की, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास अविश्वसनीय आहे. मी तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते, तुम्ही राम, कृष्ण, गांधींसारखे अमर आहात. या देशाच्या इतिहासाच्या पानात तुमचे नाव सदैव लिहिले जाईल. तुम्ही सर्वांचे लाडके आहात. तुमचा वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार मानते," असे कंगना म्हणाली आहे.

कंगनाने फोटो शेअर करत एक लांबलचक नोट लिहिली आहे.
कंगनाने फोटो शेअर करत एक लांबलचक नोट लिहिली आहे.

2018 च्या कार्यक्रमात कंगनाने घेतली होती पंतप्रधानांची भेट
कंगनाने 2018 मधील एका इव्हेंटचा फोटो शेअर केला, या कार्यक्रमात कंगनाने गीतकार प्रसून जोशी यांच्यासह नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे कौतुक करताना कंगना म्हणाली होती, "मी मोदीजींच्या सक्सेस स्टोरीमुळे त्यांची खूप मोठी फॅन आहे. एक तरुणी असल्याने मला वाटते की आमच्यासाठी योग्य आदर्श असणे खूप महत्त्वाचे आहे. माझा अर्थ एका व्यक्तीचा आलेख आणि त्याची महत्वाकांक्षा आहे," असे कंगना म्हणाली होती.

इमरजन्सीमध्ये दिसणार आहे इंदिरा गांधीच्या भूमिकेत
सध्या कंगना तिच्या आगामी 'इमरजन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर अनुपम खेर जेपी नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. पुपुल जयकरांच्या भूमिकेत महिमा चौधरी, अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिकेत मिलिंद सोमण दिसणार आहे. दिग्दर्शनासोबतच कंगनाने इमरजन्सीचे लेखनही केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रेणू पिट्टी आणि कंगना यांनी संयुक्तपणे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...