आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑन लोकेशन:कंगना रनोटने पूर्ण केले 'तेजस'चे मुंबई शेड्यूल, एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत झळकणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटासाठी सरकार आणि एअरफोर्सकडून परवानगी घेतली

अभिनेत्री कंगना रनोट हिने तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाचे मुंबईचे शेड्युल पूर्ण केले आहे. याबद्दल माहिती देताना कंगनाने सोशल मीडियावर चित्रपटाचे काही 'बिहाइंड द सीन'चे फोटो शेअर केले आहेत. कंगनाने हे फोटो शेअर करताना लिहिले, 'तेजसचे मुंबईचे शेड्युल यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि पुढील शेड्यूलसाठी दिल्ली आणि राजस्थानकडे प्रस्थान करु,' असे सांगितले आहे. चाहत्यांच्या प्रेम आणि प्रार्थनांबद्दल कंगनाने आभारदेखील व्यक्त केले आहेत.

एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत आहे कंगना

कंगनाने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ती भारतीय हवाई दलाच्या अधिका-याच्या ड्रेसमध्ये दिसतेय. यापूर्वी या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना तिने लिहिले होते, 'मी तेजसमध्ये शीख सोल्जरची भूमिका साकारत आहे. वर्दीवरील माझे पूर्ण नाव वाचेपर्यंत मला याबद्दल काहीही माहिती नव्हते. हे वाचल्यानंतर माझ्या चेह-यावर हास्य उमटले,' असे कंगना म्हणाली होती.

चित्रपटासाठी सरकार आणि एअरफोर्सकडून परवानगी घेतली

आपल्या लूक आणि चित्रपटाच्या कथेबद्दल कंगनाने सांगितले होते की, “चित्रपटातील माझा लूक लोकांना खूपच आवडला. ही एअरफोर्स पायलटची कहाणी आहे. त्यांचा जो पोशाख आणि दृष्टीकोन आहे, त्यापासून आम्ही प्रेरणा घेतली आहे. दिग्दर्शक सर्वेश मेवाडा आणि त्यांच्या टीमने यावर बरेच संशोधन केले आहे. एअरफोर्सकडून विशेष परवानगी घेण्यात आली आहे. चित्रपटाचे हे शीर्षक मिळवण्यासाठी सरकारकडून देखील परवानगी घेण्यात आली आहे.'

चित्रपटाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सरकार आणि एअरफोर्सच्या परवानगीने असल्याचे तिने स्पष्ट केले. अशा प्रकारे, आम्ही लूक डिझाइन केला नसून तो फॉलो केला आहे, असे कंगनाने स्पष्ट केले होते. हा एखाद्याचा पायलटचा बायोपिक नसल्याचेही तिने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...