आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाचे अफेअर्स:वादग्रस्त आहे कंगना रनोटची लव्ह लाइफ, 13 वर्षांनी मोठ्या हृतिक रोशनपासून ते 22 वर्षे मोठ्या आदित्य पंचोलीसोबत होते अफेअर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाची लव्ह लाईफ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

अभिनेत्री कंगना रनोट पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड हृतिक रोशनमुळे चर्चेत आली आहे. कंगना आणि हृतिक यांच्यातील चार वर्षे जुन्या ईमेल प्रकरणातील गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग अर्थात सीआययूकडे वर्ग करण्यात आला आहे. पुर्वी या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे होता. कंगना एकेकाळी तिच्यापेक्षा वयाने 13 वर्षे मोठा आणि विवाहित असलेल्या हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

इतकेच नाही तर पत्नी सुझानपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिकने कंगनासोबत साखरपुडादेखील केला होता. मात्र नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. तसे पाहता कंगनाची लव्ह लाईफ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कोणत्या कलाकारांशी तिचे अफेअर होते ते पाहुया.

आदित्य पंचोली

जेव्हा कंगना रनोट मुंबईत स्ट्रगल करत होती, तेव्हा तिचे नाव 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या आदित्य पंचोलीशी जुळले होते. विवाहित आणि दोन मुलांचा वडील असलेल्या आदित्यसोबत कंगना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. वास्तविक, आदित्य कंगनाचा मेंटॉर होता. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार आदित्य आणि कंगना हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर कंगनाने आदित्यवर मारहाण आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत आदित्यसोबतचे नाते तोडले होते.

अध्ययन सुमन

Kangana Ranaut's Controversial Love Life
Kangana Ranaut's Controversial Love Life

आदित्यनंतर कंगनाचे नाव शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनसोबत जुळले होते. दोघांनी 'राज -2' मध्ये एकत्र काम केले होते. दोघांचे अफेअर होते. मात्र वर्षभरात त्यांचे ब्रेकअप झाले.

ब्रेकअपनंतर अध्ययनने एका मुलाखतीत कंगनावर अनेक आरोप केले होते. त्याने म्हटल्यानुसार, कंगना त्याला मारहाण आणि शिवीगाळ करत असे. त्याचबरोबर कंगना काळी जादू करत असून त्याच्या जेवणात रक्त मिसळवत असल्याचा आरोपही त्याने केला होता.

एका एंटरटेनमेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन म्हणाला होता - 'मी कंगनाला आता पूर्णपणे विसरलो आहे. माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडले ते विसरुन आता मी पुढे गेलो आहे. मला कंगनासोबत असलेले नाते आता आठवायचे देखील नाही.'

अजय देवगण

अभिनेता अजय देवगणचे नावही कंगनासोबत जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघे 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' चित्रपटाच्या सेटवर जवळ आले होते. अजयने 'तेज' आणि 'रासकल्स' या चित्रपटासाठी कंगनाचे नाव सुचवले होते. दोघांमधील जवळीक बघून अजयची पत्नी काजोल वैतागली होती, त्यानंतर अजयने आपली पावले मागे घेतली आणि कंगनापासून अंतर ठेवले.

बातम्या आणखी आहेत...