आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या आजोबांचे निधन:कंगनाचे आजोबा ब्रह्म चंद रुनोट यांनी वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, भावूक झालेली कंगना म्हणाली - आम्ही त्यांना डॅडी म्हणायचो

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचे आजोबा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिचे आजोबा ब्रह्म चंद रुनोट यांचे निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते आणि मागील काही महिन्यांपासून आजारी होते. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून कंगनाने आजोबांच्या निधनाची बातमी दिली आहे.

कंगनाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, "आज संध्याकाळी मी माझ्या आईवडिलांच्या घरी पोहोचले. कारण माझे आजोबा श्री. ब्रह्म चंद रुनोट गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मी घरी पोहोचलो तेव्हा त्यांचे निधन झाले होते. ते 90 वर्षांचे होते आणि या वयातही ते आपल्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी परिचित होते. आम्ही त्यांना डॅडी म्हणायचो. ओम शांती." अशा आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली.

बातम्या आणखी आहेत...