आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयकर विभागाने बुधवारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरावर छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान 370 कोटींच्या टॅक्सी चोरीची माहिती समोर आली. या छापेमारीवर आता अभिनेत्री कंगना रनोटे आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत तापसी आणि अनुरागवर निशाणा साधला.
कंगनाने पोस्टमध्ये लिहीले, "चोर फक्त चोरच असतात, पण, जे मातृभूमीला विकून त्याचे तुकडे करतात, ते गद्दार असतात. जे गद्दरांना मदत करतात, तेही चोरच असतात. चोर-चोर मामस भाऊ आणि चोर ज्यांना घाबरतात, त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात."
ब्लॅक मनीची देवाण-घेवाण झाली
कंगनाने पुढे लिहीले, "हे फक्त टॅक्स चोर नाहीत, तर ब्लॅक मनीची मोठे देवाण-घेवाण केलीये. यांना शाहीनबाग दंगल किंवा 26 जानेवारी रोजी हिंसा भडकवण्यासाठी पैसे मिळाले होते का ? ब्लॅक मनी कुठून आली आणि कुठे पाठवली, याचा हिशोबच नाही..?'
हे दहशतवादी आहेत
तिने पुढील पोस्टमध्ये लिहीले, 'मिनीटा मिनीटाला आकडा वाढत आहे, हे पैसे ते आहेत, ज्यांचा क्लू मिळाला आहे. विचारही करू शकत नाही, की मनी लॉन्ड्रिंगचा खरा आकडा काय आहे. या तुकडे-तुकडे गँगच्या दहशतवादावरुन पडदा बाजूला होत आहे. हे फक्त टॅक्सचोर नाहीत, तर दहशतवादी आहेत.'
कंगनाने पुढे लिहीले, " Kwan एजंसी आणि फँटम प्रोडक्शन हाउसमधील लोक 'मीटू कँपेन'दरम्यान बलात्कारासारख्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी होते. पण, बुलीवुडने त्यांना वाचवले. अनुराग कश्यपसारखे लोक फक्त बलात्कारातील आरोपी नाहीत, तर त्यांनी सुशांतच्या मृत्यूला बरोबर ठरवण्याचाही प्रयत्न केला."
सर्व रेपिस्टनंतर बुलीवुडचा नंबर
कंगना पुढे म्हणाली, "कधीच कोणत्या महीलेचा श्राप व्यर्थ जात नाही. आज सर्व रेपिस्टची लंका लागली आहे. अनेक विक्टिमने 'फँटम फिल्म्स' आणि kwan विरोधात आवाज उठवली होती, पण त्यांना अचानक गायब करण्यात आले. बुलीवुडने यांना डोक्यावर बसवले होते. पण, आज सर्व रेपिस्टची लंका लागली आहे आणि आता बुलीवुडचा नंबर आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.