आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाचा भारत बंदला विरोध:कंगना रनोट शायरी शेअर करत म्हणाली, 'चला देशभक्तांनी देखील रस्त्यांवर या... आज हा किस्सा इथेच संपवू...'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या ती शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वारंवार टीका करत आहे.

शेतकरी कायद्यांच्या विरोधात 13 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीला चहुबाजुंनी घेरले आहे. आज भारत बंदाची हाक देण्यात आली आहे. 20 राजकीय पक्ष आणि 10 ट्रेड यूनियन्स भारत बंदाचा पाठिंबा देत आहेत. सकाळी 8 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. शेतक-यांच्या या आंदोलनाला अभिनेत्री कंगना रनोटने विरोध दर्शवला आहे. सध्या ती शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वारंवार टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर आता तिने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदवरही टीका केली आहे.

“आओ भारत को बंद कर देते हैं, यूं तो तूफानों की कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी, कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज मरती है हर उम्मीद यहां, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकड़ा अब तुम भी मांग लो, आ जाओ सड़क पर और तुम भी धरना दो, चलो आज यह किस्सा ही खत्म करते हैं.” अशी शायरी लिहून तिने आंदोलनकर्त्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शेतकरी आंदोलनावर कंगना वारंवार करतेय टीका
कंगना रनोट सुरुवातीपासूनच दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला विरोध दर्शवत आहे. सरकारला समर्थन देत शेतक-यांवर ची टीका करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एक वादग्रस्त पोस्ट शेअर करुन नवीन वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे तिच्यावर बरीच टीकादेखील झाली होती.
शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध शेतकरी आणि त्यांची कुटुंबे सामील झाली आहेत. यात सामील एक वर्षीय वृद्ध महिला, ज्यांना सगळे ‘दादी’ म्हणत आहेत, त्यांच्यावरच कंगनाने टीका केली होती. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘हा..हा..हा.. या त्याच दादी आहेत, ज्यांना टाईम मॅगझिनने सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये सामील केले आहे. या आता 100 रुपयांत उपलब्ध आहेत. पाकिस्तानी पत्रकार भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुप्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला असे लोक हवे आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्यासाठी आवाज उठवू शकतील.’

या पोस्टनंतर तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. सदर प्रकार लक्षात आल्यावर कंगनाने आपले ट्विट डिलीट केले. मात्र, यावर कुठलेही स्पष्टीकरण तिने अद्याप दिलेले नाही. तसेच तिने माफीदेखील मागितली नाही. कंगनाच्या या डिलीट पोस्टचे स्क्रिन शॉट काढून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील कलाकारांनीही यावरुन कंगनाला चांगलेच सुनावले. मीका सिंग, दिलजीत दोसांज, गिप्पी ग्रेवाल, जसबीर जस्सी आणि स्वरा भास्करसह अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser