आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम:मीना कुमारी यांच्या सावत्र मुलाने कंगना रनोटला म्हटले निरक्षर, म्हणाले - ही अभिनेत्री आईचे तीन तलाक आणि हलालासंदर्भात खोट्या गोष्टी पसरवतेय

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनासारखी एक मूर्ख मुलगी आमची प्रतिमा मलिन करत आहे.

अभिनेत्री कंगना रनोट मागील काही दिवसांपासून बॉलिवूड स्टार्सबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत आहे. अलीकडेच तिने उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणून हिणवलं. त्यानंतर आता तिने दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या रोषाला तिला सामोरे जावे लागले आहे. मीना कुमारी यांना तीन तलाक आणि हलालाचे दुःख सहन करावे लागले होते, असे कंगनाने एका मुलाखतीत म्हटले आहे.

  • कंगना आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा मलिन करीत आहे

मीना कुमारी यांचा सावत्र मुलगा ताजदार अमरोही यांनी कंगनाच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ताजदार कंगनावर संतापले आणि तिच्या वक्तव्याचे खंडन केले. ते म्हणाले की, "आमचे घराणे आणि मीना कुमारी यांची एक प्रतिष्ठा आहे आणि कंगनासारखी एक मूर्ख मुलगी आमची प्रतिमा मलिन करत आहे."

ते पुढे म्हणाले की, एका टीव्ही चॅनेलशी झालेल्या संभाषणात कंगनाने माझ्या आईचे नाव घेतले आणि त्यांच्या हलालासंदर्भात वक्तव्य केले. तिला कदाचित माहित नसावे की, मीना कुमारी आणि माझे वडील कमाल अमरोही हे दोघेही शिया मुस्लिम होते आणि शिया मुस्लिमांमध्ये हलाला नसतो.

मी बर्‍याचदा या गोष्टीवर स्पष्टीकरण दिले आहे आणि आता मी पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती करत आहे. आईबद्दल पुन्हा पुन्हा तीच गोष्ट ऐकून मला वाईट वाटतं. जर कंगना नॅशनल टेलिव्हिजनवर अशा गोष्टी बोलत असेल तर तिने आधी संपूर्ण चौकशी केली पाहिजे, असे ताजदार म्हणाले.

कंगणाने माझ्या आई आणि वडिलांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करुन कुटुंबाला दिलेला आघात असह्य आहे. एखाद्याच्या कुटूंबाबद्दल नकारात्मक विधान करण्यापूर्वी सत्य माहित असणे आवश्यक आहे. कंगनाने चुकीच्या गोष्टी पसरवू नयेत आणि आमच्या कुटूंबाची क्षमा मागावी, जेणेकरुन लोकांचे हे गैरसमज दूर होतील, असेही ताजदार म्हणाले आहेत.

  • कंगनाला म्हटले निरक्षर

ताजदार यांनी कंगनाच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "कंगना म्हणते की तिने वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले, म्हणजेच तिने अभ्यास पूर्ण केला नाही. ती अशिक्षित आहे, शिक्षित नाही, म्हणून मी तिच्याविरूद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करत नाहीये. अन्यथा, मी तिच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला असता. ती वूमन कार्ड खेळून चर्चेत येत असते,' असेही ते म्हणाले.

मीना कुमारी यांनी 1952 मध्ये दिग्दर्शक आणि पटकथा लेखक कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी कमाल आधीच विवाहित आणि तीन मुलांचे वडील होते. लग्नाच्या वेळी मीना कुमारी 19 वर्षांच्या तर कमाल अमरोही 34 वर्षांचे होते. मीना कुमारी यांचे 31 मार्च 1972 रोजी लिव्हर सिरोसिसमुळे निधन झाले होते. त्यावेळी त्या 38 वर्षांची होत्या.

बातम्या आणखी आहेत...