आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाची भूमिका:कंगना रनोटचा दावा - जर नार्कोटिक्स ब्युरो बॉलिवूडमध्ये शिरले तर अनेक दिग्गज सेलिब्रिटींचा पर्दाफाश होईल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

अभिनेत्री कंगना रनोट सुरुवातीपासूनच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा म्हणून लढा देत आहे. याप्रकरणी तिने बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीला तोंड फोडले. आता कंगनाला सुशांतच्या कुटुंबीयांनीही आपला पाठिंबा दिला आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने तिचे कौतुक केले. या प्रकरणी रिया चक्रवर्तीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड झाल्यानंतर तिचे ड्रग्ज कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. यानंतर कंगनाने पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. जर नार्कोटिक्स विभागाने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली तर अनेक ए-लिस्टर्सवरुन पर्दाफाश होईल, असे कंगना म्हणाली आहे.

  • कंगनाने बॉलिवूडमध्ये म्हटले गटार

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'जर नार्कोटिक्स ब्युरोने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तर अनेक ए-लिस्टर्स तुरुंगात जातील. जर त्यांची रक्त तपासणी केली गेली तर अनेक आश्चर्यकारक खुलासे होतील. मला आशा आहे की पीएमओ स्वच्छ भारत अभियानांतर्गत बॉलिवूड नावाच्या गटाराची साफसफाई करतील', असे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.