आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात शुटिंग:7 महिन्यांनंतर कामावर परतत आहे कंगना रनोट, दक्षिण भारतात सुरु करणार ‘थलायवी’ची शूटिंग, चित्रपटात साकारली जयललितांची भूमिका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोट सात महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटिंगवर परतत आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग रखडले होते आणि कलाकारदेखील शूटिंग टाळत होते. मात्र आता परिस्थिती पुर्वपदावर येताना दिसत असून अनेक कलाकारांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. कंगना रनोटदेखील सात महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटिंगवर परतत आहे.

कंगनाने ट्विटरवर याविषयीची माहिती देताना लिहिले, "प्रिय मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, 7 महिन्यांनंतर पुन्हा काम करणार आहे, माझा मोठा प्रोजेक्ट 'थलायवी'साठी दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या काळात तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. मी काही सेल्फी शेअर करत आहे, आशा आहे की तुम्हाला आवडतील." लॉकडाऊनच्या काळात कंगना तिच्या मनाली येथील घरी होती.

हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनाववर आधारित आहे

'थलायवी' हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. कंगना जयललितांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने 20 किलो वजन वाढवले.

ए.एल. विजय दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 26 जून 2020 ही निश्चित करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे शूटिंग वेळेवर पूर्ण होऊ शकली नाही. या चित्रपटाचे शूटिंग अद्याप बाकी आहे, त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा होईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser