आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनावर राजद्रोहाचा खटला:कंगना आणि तिच्या बहिणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा पाठवले समन्स, भावाच्या लग्नासाठी दोघीही सध्या हिमाचलमध्ये

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आहे कंगनावर आरोप

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोलीला पुन्हा समन्स बजावले आहेत. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी तर रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात हजर रहायचे आहे. 17 ऑक्टोबर रोजी दोघींविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

यापूर्वी कंगनाला 26 ऑक्टोबर रोजी तर रंगोलीला 27 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र भावाच्या लग्नाचे कारण देत कंगनाने चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचे सांगितले होते. दोघीही बहिणी सध्या हिमाचलमध्ये आहेत.

दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप
कंगनासह तिची बहीण रंगोली रनोट विरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्विट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

कंगनावर याचिकाकर्त्याचे हे आहेत आरोप
दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. कंगना रनोेटने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते, असा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.