आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमध्ये वादविवाद:सुशांतच्या आत्महत्येवर कंगनाचे विधान पीआर स्टंटचा भाग?, अभिनेत्रीच्या टीमने दिले स्पष्टीकरण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचा 'तो' व्हिडीओ एक पीआर स्टंट असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेत्री कंगना रनोटने बॉलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचले जाते, इंडस्ट्रीतल्या घराणेशाही (नेपोटिझम) ने सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा घणाघात कंगनाने केला होता. कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट करत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या दिग्गजांवर निशाणा साधला होता.  हा व्हिडीओ समोर आल्यापासून तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत वाढली आहे. त्यामुळे कंगनाचा हा व्हिडीओ एक पीआर स्टंट असल्याचे काहींचे म्हणणे आहे. 

पण कंगनाच्या टीमने याचे खंडन केले आहे. टीमने स्पष्टीकरण देताना लिहिले की, 'जर मिस रनोट यांना फॉलोअर्सची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रिेत करायचे असते तर त्यांना फक्त एक अकाऊंट बनवण्याची गरज होती. त्यांनी सोशल मीडियावर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नक्कीच एक यशस्वी अभिनेत्री असून आपली वाढत असलेली फॉलोविंगला एन्जॉय करु शकतात', असे कंगनाच्या टीमकडून सांगण्यात आले आहे. कंगना तिचे सोशल मीडिया अकाऊंट स्वतः सांभाळत नसून यासाठी तिने टीम हायर केली आहे. तिचे ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंट तिची टीम हँडल करत असते. 

कंगनाच्या टीमने सुशांतच्या निधनाच्या दुस-या दिवशी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याद्वारे कंगनाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तिने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडवर निशाणा साधला होता. सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याचा खून झाला आहे, असे धक्कादायक वक्तव्य तिने केले होते. पण काही जण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. जो इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले कसे असू शकते? असा सवाल कंगनाने केला होता.

‘काय पो चे’ सारख्या चित्रपटाला त्याच्या पदार्पणाला कुठल्याही प्रकारची पोचपावती का नाही, कुठला अवॉर्ड का नाही मिळाला?, केदारनाथ, एम. एस. धोनी किंवा छिछोरे सारख्या चित्रपटांना अवॉर्ड नाही, गल्ली बॉय सारख्या चित्रपटाला अवॉर्ड मिळतो मग छिछोरेला का नाही, असाही सवाल कंगनाने उपस्थित केला होता. 

आम्हाला तुमचे काही नको, तुमचे चित्रपट नको, पण जे आम्ही करतो तुम्ही ते का नाही पाहात. मी ज्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले, त्या चित्रपटांना यांनी फ्लॉप ठरवले, माझ्यावर सहा खटले का चालवण्यात आले, मला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न का केला गेला, असेही कंगना म्हणाली होती. 

0