आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉन्ट्रोव्हर्सी 'क्वीन'ला कायदेशीर नोटीस:अभिनेत्री कंगना रनोटने 7 दिवसांच्य आत 90 वर्षीय वृद्ध महिलेवर केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अन्यथा गुन्हा नोंदवला जाईल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंग यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
  • दिल्लीच्या शाहीन बागच्या आंदोलनात सामील झालेल्या 90 वर्षीय बिल्किस बानो यांच्यावर कंगनाने सोशल मीडियावर कमेंट टाकली होते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडली आहे. यावेळी तिने दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या 90 वर्षीय बिल्किस बानो यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. त्यानंतर लोक तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत आणि तिला माफी मागण्यास सांगत आहेत. आता पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंग यांनी तिला याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हाकम सिंह यांनी आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आंदोलन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा घटनात्मक अधिकार आहे.

वरिष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंग
वरिष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंग

परंतु आपल्या या भाष्यामुळे आपण केवळ या वृद्धेचाच नव्हे तर देशातील उर्वरित महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे तुम्हाला माफी मागावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर सात दिवसांच्या आत माफी न मागितल्यास कंगनाविरूद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

कंगनाने आपल्या कमेंटमध्ये म्हटले होते की, शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या 90 वर्षीय बिल्किस बानो या आंदोलनातही सामील झाल्या. 100 रुपयांसाठी त्या कोणत्याही आंदोलनात सामील होतात असा दावा कंगनाने केला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser