आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मोठे वक्तव्य:हृतिकसोबतच्या वादानंतर कंगनाला 18 ब्रांड्समधून काढण्यात आले होते, म्हणाली - 'मुंडण करुन कुठे तरी गायब व्हावे वाटत होते'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना रनोट बॉलिवूड माफिया आणि इंडस्ट्रीशी संबंधित मोठे खुलासे करीत आहेत. या अभिनेत्रीने अनेक सेलिब्रिटींवर विखारी टीका केली आणि त्यांना सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले. दरम्यान, नुकत्याच दिलिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने तिचा वाईट अनुभव शेअर केला. बॉलिवूडमध्ये आपली प्रतिमा कशी खराब झाली आणि तिच्या मनात वाईट विचार कसे येत होते हे तिने सांगितले आहे.

सुशांत प्रकरणातील रिपब्लिक टीव्हीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, 'हृतिकच्या प्रकरणानंतर अवघ्या 2 महिन्यांतच मला 18 ब्रांड्समधून काढून टाकण्यात आले. मला डायन आणि निम्फोमेनिएक (कंट्रोलपेक्षा जास्त सेक्सुअल डिजायर असणारी महिला) ,  मानवी भक्षण करणारी महिला असे म्हटले गेले होते. माझे लग्न आणि कुटुंब बनवण्याचे पर्याय संपले होते.

पुढे कंगना म्हणाली - 'करण जोहरने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकस्च्या इव्हेंटमध्ये हे देखील म्हटले होते की, माझ्या सारख्या मुलीने इंडस्ट्री सोडून द्यायला हवी. मी कधीच स्वतःला संपवण्याचा विचार केला नाही पण मला मुंडण करुन गायब व्हावे वाटत होते. अभिनेत्रीने सांगितले की, एवढे सर्व झाल्यानंतर तिचे नातेवाईक त्यांच्या मुलांना तिला भेटायची परवानगी देत नव्हते. कारण गावात अब्रू सर्व काही असते.'

जावेद अख्तर यांनी दिला हृतिकची माफी मागण्याचा दबाव टाकला  
स्वामी विवेकानंदांकडून मिळालेल्या शिक्षेमुळे माझ्या मनात आत्महत्या करण्याचा कधी विचार आला नसल्याचे कंगना सांगते. पुढे अभिनेत्रीने खुलासा केला की, हृतिकसोबत झालेल्या वादानंतर जावेद अख्तरने तिला आपल्या घरी बोलावले होते. जावेद यांनी म्हटले होते की, तु हृतिकची माफी माग, अन्यथा तुला आत्महत्या करावी लागेल. अभिनेत्रीने करण जोहर, जावेद अख्तर आणि महेश भट्टसारख्या अनेक व्यक्तींना बॉलिवूडची सुसाइड गँग म्हणून संबोधले.