आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उर्मिलाला पाठिंबा, कंगनावर निशाणा:काँग्रेस नेते सचिन सावंतकडून कंगनाचा निषेध, म्हणाले - तिला पाठिंबा देणा-या भाजपने माफी मागावी; प्रिया दत्त म्हणाल्या - कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना..

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले आहे.

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करुन मोठ्या वादंगाला तोंड फोडणा-या कंगना रनोटवर एका मुलाखतीतून उर्मिला मातोंडकरने निशाणा साधला. त्यानंतर संतापलेल्या कंगनाने उर्मिलाला चक्क सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. त्यावरुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले.

उर्मिला मातोंडकरवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल कंगना रनोटवर जोरदार टीका होत आहे. कंगनाने माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा निषेध व्यक्त करत तिला पाठिंबा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असे म्हटले आहे.

'कंगना रनोटने उर्मिला मातोंडकरजींबद्दल वापरलेल्या हीन शब्दांचा जाहीर निषेध! कंगनाला पाठिंबा देणा-या भाजपाना महाराष्ट्राच्या जनतेची तत्काळ माफी मागितली पाहिजे,' अशा आशयाचे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

तर काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनीही उर्मिला मातोंडकरला पाठिंबा दिला आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.. असे ट्विट प्रिया दत्त यांनी केले आहे.

  • कंगनाच्या वक्तव्यावर उर्मिलाची संयमी प्रतिक्रिया

कंगना एका मुलाखतीत म्हणाली की, "उर्मिला मातोंडकरचा एक इंटरव्‍ह्यू पाहिला. ज्याप्रकारे ती माझ्याबद्दल बोलत आहेत, ते पूर्णत: डिवचण्यासारखे आहे. तिने माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली. मला भाजपकडून तिकीट हवंय, असे वाटत असल्याने ती माझ्यावर हल्ला करत आहे. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. ती नक्कीच तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नव्हती. ती कशासाठी ओळखली जायची, सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर तिला तिकीट मिळू शकते तर मला का नाही मिळणार?", असे कंगना म्हणाली.

यावर उर्मिलाने ट्विट करत अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. "प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है. शिवाजी महाराज अमर रहें." असे ट्विट उर्मिलाने केले आहे.