आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना V/S BMC:'थलाइवी'च्या सेटवरुन कंगनाचा व्हिडिओ, म्हणाली - 'तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाला न्यायालयाकडून ताकीद

अभिनेत्री कंगना रनोट हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कंगना रनोटच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, कंगनाला ही कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मदत सुद्धा मिळू नये असे प्रयत्न झाले. मुळात बीएमसीने (बृहन्मुंबई महापालिका) कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसाठी जी नोटिस बजावली होती तीच उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कंगनाने तिच्या आगामी थलाइवीच्या शूटिंग सेटवरुन सोशल मीडियावर एक थँक्यू व्हिडिओ शेअर केला आहे, यात तिने आपल्या या विजयाला लोकशाहीचा विजय म्हटले आहे.

'तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले'

"मला एक खूप चागंली बातमी मिळाली आहे. न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजुने आला आहे. मी न्यायलयाची आऱाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि विजय मिळवते तेव्हा हा त्याचा एकट्याचा नाही तर लोकशाहीचा विजय असतो. मला हिंमत देणाऱ्या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले", अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.

कंगनाला न्यायालयाकडून ताकीद
कंगनाने बीएमसीकडे दोन कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे. यावर न्यायालयाने निरीक्षक/ मूल्यकाची नियुक्ती केली असून, त्यांना कंगनाच्या नुकसान भरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या या संपूर्ण घटनाक्रमासाठी न्यायालयाने कंगनाला सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या विधानांवर संयम बाळगण्याची ताकीद दिली आहे.

शुक्रवारी सकाळी घेतली संजय दत्तची भेट
कंगना सध्या ‘थलाइवी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबाद येथे आहे. दरम्यान कंगनाने अभिनेता संजय दत्तची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्वतः कंगनाने संजय दत्तशी भेट झाल्याचे सांगितले आहे. ‘हैदराबादमध्ये आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत आहोत हे कळताच आज सकाळी मी संजू सरांना भेटण्यासाठी गेले. मी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. पण जेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा ते तितकेच हँडसम आणि निरोगी दिसत होते. मी तुमच्या निरोगी आयुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते’, असे कंगना म्हणाली आहे. कंगनाने या भेटीचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser