आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kangna Ranaut: Kangna Ranaut In Chandigarh Mohali Update | Queen Actor On Her Y Plus Category Of CRPF Commando Security; Here's The Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Y सिक्युरिटीविषयी कंगनाचे विधान:अभिनेत्री म्हणाली - चंदीगडमध्ये उतरताच सुरक्षा नाममात्र राहिली होती; मात्र सत्य वेगळेच, सुरक्षेसाठी एक डीएसपी, 22 पोलिस, 6 कमांडो आणि 10 सीआयएसएफ जवान तैनात होते

मोहाली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी कंगना मुंबईहून चंदीगडला पोहोचली. एअरपोर्ट डीएसपींच्या नेतृत्वात पंजाब पोलिसांनी सुरक्षा दल तैनात केले होते.
  • पंजाब पोलिसांनी सांगितले की, कंगनाला प्रोटोकॉल अंतर्गत सुरक्षा देण्यात आली होती.
  • महाराष्ट्र सरकारशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने कंगनाला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट सोमवारी सकाळी वाय श्रेणीच्या सुरक्षेसह मुंबईहून चंदीगडला आली. कंगना येथे पोहोचणार असल्याची माहिती पंजाब पोलिस आणि चंदीगड विमानतळाच्या सुरक्षा शाखेला आधीच देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्या सुरक्षेसाठी एअरपोर्ट डीएसपींच्या नेतृत्वात सुरक्षा दल तैनात केले होते. डीएसपी एअरपोर्ट जतिंदर पाल सिंह यांनी सांगितले की, पंजाब पोलिसांचे एक डीएसपी, 22 पोलिस, 6 कमांडो आणि सीआयएसएफचे 10 जवान कंगनाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

कंगना एअरपोर्ट टर्मिनलबाहेर येताच सीआयएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या जवानांनी तिला घेराव घातला. मोहाली सोडताना कंगनाने सोशल मीडियावर एक मेसेज पोस्ट करुन सांगितले होते की, 'चंडीगडमध्ये उतरल्यानंतर माझी सुरक्षा नाममात्र राहिली आहे.' पण, प्रत्यक्षात तिच्या सुरक्षेमध्ये कोणतीही कमतरता ठेवण्यात आली नव्हती.

चंदीगड विमानतळाचा हा फोटो 9 सप्टेंबरचा आहे. त्यादिवशी कंगना मुंबईत आली होती.
चंदीगड विमानतळाचा हा फोटो 9 सप्टेंबरचा आहे. त्यादिवशी कंगना मुंबईत आली होती.

गेल्या आठवड्यात कंगना चंदीगडहून मुंबईला गेली तेव्हा जेवढे जवान तिच्या सुरक्षेसाठी तैनात होते, तेवढे सोमवारीदेखील होते. एसएसपी कुलदीपसिंग चहल म्हणाले की, कंगनाला प्रोटोकॉल अंतर्गत सुरक्षा देण्यात आली होती. एअरपोर्ट टर्मिनलपासून ते कंगना ज्या गाडीला बसणार होती तिथवर पंजाब पोलिस तैनात होते. 100 मीटरच्या परिघात सुमारे 22 जवान होते.

  • रोपडच्या वाटेवर 37 पोलिस उभे होते

जेव्हा कंगना मनालीच्या दिशेने आपल्या गाडीतून रवाना झाली तेव्हा पंजाब पोलिसांची वाहने मागे-पुढे होती. दोन्ही गाड्यांमध्ये जवळपास 6 ते 8 जवान होते. रोपड बॉर्डरकडे जाणा-या रस्त्यावर सुमारे 37 जवान तैनात होते.