आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'वरून कंगनाचा करणवर निशाणा:हे लोक अप्रामाणिक वागू शकतात, परंतु एक चांगला प्रामाणिक चित्रपट बनवू शकत नाहीत

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनोट हिचीदेखील आता प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना कंगनाने करण जोहर, अयान मुखर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. अयान मुखर्जीला जीनिअस म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, असे ती म्हणाली आहे.

अयानला जीनिअस म्हणण्यास भाग पाडले: कंगना
ब्रह्मास्त्रला दिलेल्या नकारात्मक रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनाने लिहिले, 'जेव्हा तुम्ही असत्य खपवण्याचा प्रयत्न करता.... करण जोहर लोकांना प्रत्येक शोमध्ये रणबीर-आलियाला सर्वोत्कृष्ट कलाकार आणि अयान मुखर्जीला जीनिअस म्हणायला भाग पाडतो. हळूहळू लोकांचा या असत्यावर विश्वास बसू लागला. करिअरमध्ये एकही चांगला चित्रपट न बनवणाऱ्या दिग्दर्शकाला करणने 600 कोटी दिले,' अशी टीका कंगनाने केली आहे.

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली प्रतिक्रिया.
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली प्रतिक्रिया.

हे लोक चांगला प्रामाणिक चित्रपट बनवू शकत नाही: कंगना
कंगनाने पुढे लिहिले, 'बेबी पीआरपासून लग्नापर्यंत मीडियावर नियंत्रण ठेवले, केआरकेला तुरुंगात टाकले, रिव्ह्यू विकत घेतले, तिकिटे विकत घेतली. ते सर्व बेईमानी करू शकतात पण एक चांगला प्रामाणिक चित्रपट बनवू शकत नाहीत,' असे ती म्हणाली.

दुसर्‍या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले, "जे अयान मुखर्जीला जीनियस म्हणतात त्यांना थेट तुरुंगात टाकले पाहिजे. हा चित्रपट बनवण्यासाठी 12 वर्षे लागली. या चित्रपटासाठी त्याने 400 हून अधिक दिवस शूटिंग केले. 600 कोटी रुपये जळून राख झाले आहे.' यासह कंगनाने एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ब्रह्मास्त्रमुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या गुंतवणूकदारांना 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे तिने म्हटले आहे.

जगभरात आठ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला हा चित्रपट
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबर रोजी भारतात 5,019 स्क्रीन्सवर आणि परदेशात सुमारे 3,894 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे वितरण हक्क स्टार स्टुडिओकडे आहेत. 21 फॉक्स स्टार स्टुडिओच्या शीर्षकातून फॉक्स काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या स्टुडिओच्या नव्या नावाने प्रदर्शित होणारा 'ब्रह्मास्त्र' हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे जगभरात वॉल्ट डिस्ने स्टुडिओ मोशन पिक्चर फिल्म्सने वितरण केले आहे. हा चित्रपट भारतात 5,019 स्क्रीनसह जागतिक स्तरावर 8,913 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...