अपडेट / कनिका कपूरने ती पोस्ट केली डिलीट, ज्यात तिने स्वतःला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे सांगितले होते 

  • कनिकाने 20 मार्च रोजी पोस्ट शेअर केली होती.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 02:19:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क. गायिका कनिका कपूरने इंस्टाग्रामवरून ती पोस्ट डिलीट केली, त्यामध्ये तिने स्वतः तिची कोरोनाव्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. ट्रोलिंगमुळे नाराज झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतल्याचे समजते. खरं तर, जेव्हापासून तिचा कोरोनाव्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तेव्हापासून तो सोशल मीडियावर यूजर्सच्या निशाण्यावर आहे. विशेषत: लंडनहून परत आल्यानंतर, लोक खबरदारी न घेता पार्टी करत राहिल्याने तिला खडे बोल सुनवत आहेत.

  • कनिकाने तिच्या पोस्टमध्ये काय लिहिले होते..

कनिकाने 20 मार्च रोजी पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते, "सर्वांना नमस्कार. मला गेल्या चार दिवसांपासून फ्लूची चिन्हे दिसत होती. चाचणी घेतली असता मला कोविड -19 ची टेस्ट पॉझिटिव्ह मिळाली. माझे आणि माझे कुटुंब पूर्णपणे क्वारंटाईन आहेत. मी वैद्यकीय सल्ल्यावर आहे. ज्यांच्या मी संपर्कात आले त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे."

आपल्या पोस्टमध्ये कनिकाने असा दावाही केला होता की, 9 मार्च रोजी लंडनहून परत आल्यानंतर सामान्य प्रक्रियेनुसार तिची विमानतळावर स्क्रिनिंग झाली होती. त्यावर तिने लिहिले होते, "ही लक्षणे चार दिवसांपूर्वीच सुरू झाली आहेत. या टप्प्यावर मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की, जर तुम्हाला काही पॉझिटिव्ह चिन्ह दिसले तर सेल्फ आयसोलेशनची प्रॅक्टिस सुरु करा. मला आता चांगले वाटत आहे. सामान्य फ्लू आणि सौम्य ताप आहे. पण आपण समजूतदार नागरिक म्हणून आसपासच्या लोकांचा विचार केला पाहिजे. तज्ज्ञ, स्थानिक, राज्य आणि केंद्र सरकारचे निर्देश ऐकल्यास घाबरुन न जाता याला सामोरे जाऊ शकतो."

कनिका 20 मार्चपासून लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एसजीपीजीआयएमएस) आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहे. 22 मार्च रोजी तिची पुन्हा तपासणी केली गेली, ज्यामध्ये तिला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

X