आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीसाठी पुढे आला अभिनेता:कोरोना रूग्णांसाठी रुग्णवाहिका चालक बनला कन्नड अभिनेता अर्जुन गौडा, कोरोना संक्रमित लोकांवर केले अंत्य संस्कार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत जवळपास 6 कोरोना संक्रमित लोकांवर त्याने अंत्य संस्कार केले आहेत.

कन्नड चित्रपटसृष्टील अभिनेता आणि सर्टिफाइड न्युट्रीशियनिस्ट अर्जुन गौडा कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून आला आहे. तो कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालकाचे काम करत आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, मृत्युमूखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्याचे काम तो करत आहे. या कामासाठी त्याने स्माईल केअर फॉर ऑल नावाची मोहिम सुरु केली आहे. आतापर्यंत जवळपास 6 लोकांवर त्याने अंत्य संस्कार केले आहेत.

अर्जुनने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले की, तो आवश्यक ती सर्व खबरदारी बाळगतो. सोबतच त्याने या कामासाठी प्रशिक्षणही घेतले आहे. अर्जुन म्हणाला, 'कर्नाटकातील जनतेची सेवा आणि त्यांच्यासाठी काम करणे ही माझ्यासाठी वचनबद्धता आणि सन्मानाची बाब आहे.'

तो पुढे म्हणतो, ‘गेल्या काही दिवसांमध्ये मी अनेक कोरोना संक्रमित लोकांवर अंत्य संस्कार केले. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना वेळेवर मदत मिळावी हीच माझी इच्छा आहे. तो व्यक्ती कुठून आला आहे, त्याचा धर्म कोणता या गोष्टीने काही फरक पडत नाही. गरज असणाऱ्या व्यक्तीची मदत करण्याचा मी प्रयत्न करत आहे.’

अर्जुनने शुक्रवारी एक पोस्ट शेअर करत लिहिले -अंतिम संस्कार, न पुण्यम, न पापम, न सुख्यम न दुखम न मंत्रो, न तीर्थम न वेद न यज्ञ: अहम भेजनम नैव भोज्यम, न भोक्ता, चिदानंद रूप: शिवोहम शिवोहम। या पोस्टमध्ये अर्जुन कोरोना संक्रमित रूग्णाच्या पार्थिवाजवळ उभा दिसतोय.

अर्जुनच्या चित्रपट प्रवासाविषयी सांगायचे म्हणजे, त्याने युवारत्ना, ओडेया, रुस्तम आणि आ दर्श्या या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...