आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाने वयाच्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हृदय विकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिरंजीवी सरजा यांची कोविड -19 चीही टेस्ट झाली होती.

कन्नड चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 39 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बातमीनुसार, त्यांची कोविड -19 ची टेस्ट झाली होती, ज्याचा अद्याप रिपोर्ट आलेला नाही.  

मिळालेल्या माहितीनुसार, चिरंजीवी दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांच्या वडिलांशी फोनवर बोलत होते, त्याचवेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी तुमकुर जिल्ह्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

चिरंजीवी यांच्या निधनाची बातमी समजताच बंगळूरू येथील अपोलो रुग्णालयाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली.

22 चित्रपटांमध्ये केला अभिनय

चिरंजीवी यांनी 2009 मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांसह एकुण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.  12 मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. त्यांचे आजोबा शक्ती प्रसाद आणि काका अर्जुन सरजा हे देखील चित्रपट कलाकार आहेत. त्यांचे भाऊ ध्रुव सरजा हेदेखील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. 

दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न

चिरंजीवी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1980 रोजी झाला होता. त्यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न केले होते. 

चिरंजीवी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...