आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 वर्षीय कन्नड स्टार सतीश वज्रची हत्या:फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह, मेहुण्यावर संशयाची सुई

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सतीशच्या मेव्हण्यावर पोलिसांचा संशय

कन्नड इंडस्ट्रीतील रायजिंग स्टार सतीश वज्र याची हत्या करण्यात आली आहे. 32 वर्षीय अभिनेत्याचा रक्ताने माखलेला मृतदेह घरात सापडला आहे. सतीश बंगळुरूच्या आरआर नगरमध्ये राहत होता. वृत्तानुसार, पोलिसांनी त्याच्या हत्येच्या संशयावरून दोन जणांना अटक केली आहे. सतीशच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली होती.

धारदार शस्त्राने हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. या घटनेची माहिती सतीशच्या घरमालकाने पोलिसांना दिली होती. फ्लॅटमधून रक्त येत असल्याचे त्यांनी पाहिले होते. यानंतर घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता सतीश घरी परतताच दोन अज्ञातांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे दिसून आले. यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. यानंतर सतीशचे मारेकरी तेथून पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे.

सतीशच्या मेव्हण्यावर पोलिसांचा संशय
सतीश वज्रने घरच्यांच्या विरोधात लग्न केले होते. या लग्नामुळे सतीशचे किंवा त्याच्या पत्नीचे कुटुंबीय दोघेही खुश नव्हते. दोन्ही कुटुंबात नेहमी भांडणे होत होती. सतीशच्या पत्नीच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचे म्हटले जाते.

वृत्तानुसार, सतीशच्या मेहुण्याने आपल्या बहिणीच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी त्याच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सतीशचा मेहुणा आणि सासऱ्यांचा शोध घेत आहेत.

'लगोरी' चित्रपटातून केले होते पदार्पण
सतीश वज्र हा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील रहिवासी होता. 'लगोरी' या चित्रपटाद्वारे त्याने कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातूनच त्याला ओळख मिळाली. याशिवाय त्याने अनेक कन्नड चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले.

बातम्या आणखी आहेत...