आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्नड अभिनेत्याची हत्या:सोफ्यावर आढळला कन्नड अभिनेता सुरेंद्र बंटवालचा मृतदेह, शरीरावर धारदार शस्त्राच्या अनेक जखमा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंटवालने 'चली पोलीलू' या तुलु भाषेतील आणि 'सवर्णा दीर्घा सांघी' या कन्नड भाषेतील हिट चित्रपटांमध्ये काम केले होते.

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुरेंद्र बंटवालची हत्या झाल्याचे वृत्त आहे. बुधवारी त्याचा मृतदेह कर्नाटकच्या राहत्या घरी सोफ्यावर आढळला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राच्या अनेक जखमा होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी बंटवालवर हल्ला केला. मात्र, हत्येमागील खरे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • मित्रांना दिसला मृतदेह

वृत्तानुसार, बंटवालच्या मित्रांनी त्याला बर्‍याच वेळा फोन केला, मात्र उत्तर मिळाले नाही, त्यामुळे मित्र त्याच्या घरी आले. तेव्हा सोफ्यावर बंटवाल मृतावस्थेत त्यांना दिसला. "हत्येच्या आदल्या रात्री त्याच्याबरोबर कोण कोण होते याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे," असे पोलिसांनी एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला सांगितले.

  • बंटवालविरोधात 15 फौजदारी गुन्हे दाखल

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंटवालवर 15 फौजदारी गुन्हे दाखल आहेत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो तलवारीने भाजप कार्यकर्त्यांना धमकावताना दिसला होता. यात भाजपचे दोन कार्यकर्ते जखमीही झाले होते. या प्रकरणात बंटवालला अटक करण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. तो कॉंग्रेस पक्षात सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे.