आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक जयश्री रमैया हिने सोमवारी आत्महत्या केली. तिचा मृतदेह बंगळुरूमधील त्याच आश्रमाच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, जिथे तिच्यावर उपचार सुरू होते. वृत्तानुसार, ती ब-याच दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होती. डिप्रेशनवर उपचार घेण्यासाठी ती संध्या किरण आश्रमात राहत होती.
जयश्रीने कन्नड बिग बॉस सीझन -3 मध्ये भाग घेतला होता. गेल्या वर्षी जुलै 2020 मध्येसुद्धा तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आयुष्याबद्दल निराशा व्यक्त करत आयुष्य संपवण्याचे म्हटले होते. नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली होती.
त्यावेळी जयश्रीने एक व्हिडिओ शेअर करुन लिहिले होते, या जगाला आणि तणावाला निरोप. मी हे सर्व प्रसिद्धीसाठी करत नाहीये. मला सुदीप सरांकडून आर्थिक मदतीचीही अपेक्षा नाही. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे पण प्रचंड तणावात आहे. मी माझ्या आयुष्यातील बर्याच वैयक्तिक समस्यांना तोंड देत आहे. लहानपणापासूनच माझी सतत फसवणूक झाली आहे आणि मी त्यावर मात करू शकत नाही. मी एक अपयशी आहे. मला इच्छा मृत्यू मिळाला पाहिजे. मी एक चांगली मुलगी नाही. कृपया .. कृपया मला इच्छा मृत्यू द्या.
किचा सुदीप देवदूत म्हणून आला होता
यापूर्वी जुलै 2020 मध्ये जयश्रीने सोशल मीडियावर लाइव्ह सेशन केले होते. तिची पोस्ट समोर आल्यानंतर किचाने फोनवरुन तिच्याशी संवाद साधला होता. याचा उल्लेख जयश्रीने सोशल मीडियावर केला होता. 'सुदीप सर, माझी काळजी केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या टीमबरोबर माझे आयुष्य वाचवले. माझे प्रिय मित्र आणि चाहत्यांना माझे प्रेम. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगिर आहे. मी माझ्या जुन्या फॉर्ममध्ये परतले आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मीडियाचे खूप आभार आणि खूप प्रेम,' अशी पोस्ट तिने शेअर केली होती.
काम न मिळाल्याने तणावात होती जयश्री
सोमवारी जयश्रीला तिच्या कुटुंबीय आणि मित्रांनी बरेच फोन कॉल आणि मेसेज केले, मात्र तिने कुणालाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिच्या मित्रांनी आश्रमाच्या व्यवस्थापनास याबद्दल माहिती घेण्यास सांगितले. जेव्हा आश्रमातील अधिकारी तिच्या खोलीत पोहोचले तेव्हा जयश्री पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. त्यानंतर आश्रमाच्या अथॉरिटीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. बंगळुरूच्या मदनायकानहल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्रीने रविवारी रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
बिग बॉस व्यतिरिक्त जयश्री उप्पु हुली खारा आणि कन्नड गोथिल्ला या कन्नड चित्रपटांमध्ये झळकली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.