आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाती सुरेशची आपबिती:रूट कॅनलमुळे चेहरा बिघडला, घरातून बाहेर पडणे बंद केले, नोकरीही गेली; चित्रपटही हातून निसटला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांनी सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन दिले, नंतर भूल दिली होती

कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिच्यावर अलीकडेच रूट कॅनलची चुकीची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तिच्या चेह-याची पुरती वाट लागली आहे. आता एका मुलाखतीत स्वातीने तिच्या शस्त्रक्रियेची वेदनादायक कहाणी कथन केली आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध एफआयआर नोंदवणार असल्याचेही तिने सांगितले आहे. मंगळवारी डॉक्टरांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे स्वातीने सांगितले. चेहरा खराब झाल्याने नोकरी, मॉडेलिंग असाइनमेंट, मालिका आणि एक चित्रपट हातून निसटल्याचा खुलासा तिने केला आहे.

सर्जरीनंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचे हे वक्तव्य आले आहे. या फोटोंमध्ये तिचे संपूर्ण रूपच खराब झालेले दिसत आहे. त्यामुळे स्वातीला ओळखणे कठीण झाले आहे. यामुळे आता तिने घराबाहेर पडणे बंद केले आहे.

डॉक्टरांनी सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन दिले, नंतर भूल दिली होती
इंडिया टुडेशी संवाद साधताना स्वाती सतीशने तिच्या रूट कॅनल सर्जरीच्या प्रक्रियेबद्दल सांगितले. स्वातीने सांगितले की, जेव्हा तिने सेकंड ओपिनियनसाठी दुसऱ्या डेंटिस्टचा सल्ला घेतला तेव्हा तिला कळले की तिच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी तिला सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन दिले होते आणि त्यानंतर भूल दिली होती. तर, दुसर्‍या डेंटिस्टने स्वातीला सांगितले की, त्या डॉक्टरांनी आधी तिला भूल द्यायला हवी होती आणि नंतर सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन द्यायला हवे होते.

स्वाती म्हणाली, "ज्या क्षणी डॉक्टरांनी मला सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन दिले, तेव्हा मी रडले आणि ओरडले." ती पुढे म्हणाली, अशा चुका प्रत्येकाकडून होऊ शकतात, परंतु वैद्यकीय प्रक्रियेत अशा चुका होतात तेव्हा खबरदारीचे उपाय केले जातात. ती वेदनेने विव्हळत असताना डॉक्टरांनी तिला सलाईनचे इंजेक्शन दिले असते तर तिचा चेहरा एवढा सुजला नसता, असे स्वाती म्हणाली.

स्वाती 28 मे रोजी तिच्या रूट कॅनल शस्त्रक्रियेसाठी गेली होती
स्वातीने पुढे सांगितले की, डॉक्टरांनी असे केले नाही आणि नंतर ती विश्रांतीसाठी घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. स्वातीने सांगितले की, ती 28 मे रोजी तिच्या रूट कॅनल शस्त्रक्रियेसाठी गेली होती, परंतु तिच्या चेहऱ्यावर सूज आल्याने ती होऊ शकली नाही.

चेहरा खराब झाल्याने नोकरी गमावली आणि मॉडेलिंगच्या ऑफर हातून गेल्या
स्वाती सतीशने पुढे सांगितले की, 23 दिवसांच्या शस्त्रक्रियेनंतर ती आता बरी होत आहे. पण, तिच्या ओठांमध्ये अजूनही सेंसेशन येत आहेत आणि ओठांचा आकारही बदलला आहे. ती म्हणाली की, तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी 2 आठवडे ते 1 महिना लागू शकतो, असे डॉक्टरांनी तिला सांगितले आहे. खराब चेहऱ्यामुळे नोकरी गेली, मॉडेलिंग असाइनमेंट, मालिका आणि चित्रपटाची ऑफर देखील गमवाव्या लागल्या असा खुलासादेखील तिने केला.

स्वाती सतीशने 'FIR' आणि '6To6' सारख्या चित्रपटात काम केले आहे.
स्वाती सतीशने 'FIR' आणि '6To6' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

डॉक्टरांनी स्वातीच्या आरोपांचे खंडन केले
दुसरीकडे स्वाती सतीशवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी इंडिया टुडेला सांगितले की, अभिनेत्रीने कोणत्याही पुराव्याशिवाय आमच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "ती तिचे विधान बदलत राहते. आधी तिने सांगितले की मी तिला सॅलिक अ‍ॅसिडचे इंजेक्शन दिले आणि नंतर तिने सॅलिसिलिक अॅसिडचे इंजेक्शन सांगितले. या दोन्हींचा उपयोग दातांच्या उपचारात केला जात नाही."

डॉक्टर पुढे म्हणाले की, जे घडले ते रूट कॅनल उपचारांच्या गुंतागुंतीमुळे झाले आहे, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नाही. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिने नोकरी आणि मॉडेलिंग असाइनमेंट गमावल्याच्या स्वातीच्या दाव्याबद्दल विचारले असता. यावर डॉक्टरांनी सांगितले की, स्वातीने यापूर्वी कबूल केले होते की, तिला बाहेर काढण्यात आले नाही. मात्र, तिला बरे वाटेपर्यंत विश्रांती घेण्यास सांगितले आहे. डॉक्टर म्हणाले, "माझ्याकडे तिच्या विधानाचे वैध पुरावे आहेत. केवळ खोटे आरोपच नव्हे तर खरे सत्य बाहेर यावे अशी इच्छा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आरोप - उपचार आणि औषधांबाबत चुकीची माहिती दिली
बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या स्वाती सतीशने सांगितले होते की, तिच्यावर अलीकडेच रूट कॅनल सर्जरी करण्यात आली होती. यानंतर तिचा संपूर्ण चेहरा सुजला. 2-3 दिवसांत चेह-यावरील सूज उतरेल, असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. पण 3 आठवड्यांनंतरही तिची अवस्था तशीच राहिली. त्यामुळे तिचा संपूर्ण चेहराच बिघडला आहे. स्वातीला ओळखणेदेखील कठीण झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वातीने डॉक्टरांवर तिला उपचार आणि औषधांबाबत चुकीची आणि अर्धवट माहिती दिल्याचा आरोप केला आहे. उपचारादरम्यान तिला भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अ‍ॅसिड देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात गेल्यावर स्वातीला हा प्रकार समजला.