आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापरे! रूट कॅनलमुळे लागली चेह-याची वाट:स्वाती सतीशवर डॉक्टरांचे चुकीचे उपचार, अभिनेत्रीचा गंभीर आरोप

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता स्वातीला ओळखणे कठीण झाले आहे

कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिने नुकतीच रूट कॅनाल सर्जरी केली, ज्यासाठी तिला मोठा खर्च आला. पण चुकीच्या उपचारांमुळे स्वाती सतीश हिचा संपूर्ण चेहरा खराब झाला आहे. चुकीच्या शस्त्रक्रियेनंतर तिचे काही फोटोही समोर आले आहेत. स्वातीने तिच्या या अवस्थेसाठी डॉक्टरांना जबाबदार धरले असून तिच्यावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे.

आता स्वातीला ओळखणे कठीण झाले आहे
रिपोर्ट्सनुसार, बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या स्वाती सतीशवर नुकतीच रूट कॅनल सर्जरी करण्यात आली आहे. यानंतर तिचा संपूर्ण चेहरा सुजला असून तिला वेदना होत आहेत. डॉक्टरांनी स्वातीला आश्वासन दिले होते की, 2-3 दिवसांत तिचा चेहरा ठीक होईल आणि सूज देखील निघून जाईल. पण, 3 आठवड्यांनंतरही तिची अवस्था तशीच आहे. वेदना किंवा सूज काहीही कमी झालेली नाही. त्यामुळे तिचा संपूर्ण चेहराच बिघडला आहे. स्वातीला ओळखणेदेखील कठीण झाले आहे. यामुळे तिने आता घराबाहेर पडणे बंद केले आहे.

स्वाती सतीशने 'FIR' आणि '6To6' सारख्या चित्रपटात काम केले आहे.
स्वाती सतीशने 'FIR' आणि '6To6' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

आरोप - उपचार आणि औषधांबाबत चुकीची माहिती दिली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वातीने डॉक्टरांवर तिला उपचार आणि औषधांबाबत चुकीची आणि अर्धवट माहिती दिल्याचा आरोप केला आहे. उपचारादरम्यान तिला भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अ‍ॅसिड देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात गेल्यावर स्वातीला हा प्रकार समजला. आता स्वाती सतीश घरी आहेत.

सॅलिसिलिक अ‍ॅसिड म्हणजे काय?
सॅलिसिलिक अ‍ॅसिड हा असा एक रासायनिक पदार्थ आहे, जो विशेषत: बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्किन केयर प्रॉडक्ट्समध्ये मिसळला जातो. हे सहसा शरीराच्या बाह्य भागावर वापरले जाते. मुरुम किंवा त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. सॅलिसिलिक अ‍ॅसिडचा चुकीचा वापर केल्यास रुग्णाच्या मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. हे 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी एक विषारी औषध आहे.

कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा फॅट फ्री सर्जरीमुळे मृत्यू झाला.
कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा फॅट फ्री सर्जरीमुळे मृत्यू झाला.

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे चेतना राजचा मृत्यू झाला
स्वातीच्या आधी अभिनेत्री चेतना राज हिचीदेखील चुकीची प्लास्टिक सर्जरी झाली होती. इतकेच नाही तर गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2022 मध्ये चेतना राजचा चुकीच्या प्लास्टिक सर्जरीमुळे मृत्यू झाला होता. रिपोर्ट्सनुसार, चेतना राज फॅट फ्री सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. शस्त्रक्रियेनंतर चेतना राजची प्रकृती ढासळू लागली आणि तिच्या फुफ्फुसात पाणी भरले. त्यामुळे तिची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...