आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:लोकप्रिय कन्नड अभिनेत्री जयंती यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन,  500 हून अधिक चित्रपटांत केले काम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जयंती यांच्या निधनामिळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जातोय.

भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जयंती यांचे सोमवारी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. बंगळुरु येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विविध भाषांमधील तब्बल 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र कन्नड चित्रपटांसाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभले होते. कन्नड सिनेसृष्टीतील यशस्वी अभित्रींपैकी त्या एक होत्या.

जयंती यांचा मुलगा कृष्णा कुमार यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. बंगळूरु टाइम्सच्या वृत्तानुसार जयंती या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी एक ट्विट करत जयंती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

जयंती यांनी 1963 मध्ये जेनु गुडू या कन्नड चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी दिवंगत अभिनेता राजकुमार यांच्यासोबत 30 हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. कन्नड शिवाय त्यांनी तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले.

जयंती यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना सात वेळा कर्नाटक राज्य फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर दोन वेळा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...