आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कांतारा'ने ओलांडला 300 कोटींचा आकडा:KGF-2 नंतर एवढा गल्ला जमवणारा ठरला दुसरा कन्नड चित्रपट, हिंदी भाषेतही 50 कोटींची कमाई

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'कांतारा' हा चित्रपट दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अलीकडेच या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 285.56 कोटींची कमाई केली आहे. 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे कलेक्शन खरोखरच अवाक् करणारे आहे. ऋषभ शेट्टी स्टारर या चित्रपटाने हिंदी भाषेतही शानदार कमाई करताना जवळपास 50 कोटींची गल्ला जमवला आहे. KGF Chapter 2 नंतर 300 कोटींहून अधिक कमाई करणारा हा दुसरा कन्नड चित्रपट ठरला आहे.

जगभरात 307.56 कोटींचे कलेक्शन
रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा'ने आतापर्यंत 22 कोटींचे ओव्हरसीज कलेक्शन केले आहे. चित्रपटाने सर्व भाषांमध्ये देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 285.56 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 307.56 कोटींची कमाई केली आहे. हिंदी भाषिक क्षेत्रात या चित्रपटाची चांगलीच कमाई होत आहे. या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनने आतापर्यंत जवळपास 50 कोटींचा व्यवसाय केला आहे. हिंदी पट्ट्यात 'बाहुबली' सिरीज, 'पुष्पा', 'आरआरआर' आणि 'केजीएफ' सिरीजला मिळालेल्या यशादरम्यान 'कांतारा'नेही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा चित्रपट
'कांतारा' केवळ बॉक्स ऑफिसवरच कमाल करत नाहीये तर या चित्रपटाने IMDb रेटिंगमध्येही सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. IMDb वर 9.4 रेटिंगसह हा भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, IMDb रेटिंगमध्ये KGF 2 अव्वल होता.

30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता हा चित्रपट
ऋषभ शेट्टी स्टारर हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या सुरुवातीच्या दिवसांत चित्रपटाची कमाई खूपच कमी होती, पण हळूहळू वर्ड ऑफ माउथमुळे चित्रपटाच्या कमाईने वेग पकडला. कन्नड भाषेतील चित्रपटाची दमदार कमाई पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित केला.

बातम्या आणखी आहेत...