आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर नॉमिनेशनमध्ये देण्यात आले 'कांतारा'चे नाव:RRR सोबत शर्यतीत सामिल, निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी पाठवला अर्ज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने यंदा चित्रपटसृष्टी गाजवली. हा चित्रपट 2022 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली. आता या चित्रपटाचे नाव ऑस्करच्या नामांकनासाठी पाठवण्यात आले आहे. निर्मात्यांनी सांगितल्यानुसार, शेवटच्या क्षणी त्यांनी 'कांतारा'चे नाव ऑस्कर 2023च्या नॉमिनेशनसाठी पाठवले. चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.‘कांतारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वच रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आणि त्यातल्या अभिनयासाठी ऋषभ शेट्टीचे खूप कौतुक केले गेले. चित्रपटगृहानंतर आता ओटीटीवरही हा चित्रपट उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्यामुळेच आता या चित्रपटाचे नाव ऑस्करसाठी देण्यात आले आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बले प्रोडक्शन्सचे संस्थापक विजय किरांगदुर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, 'कांतारा’ या चित्रपटाचे ऑस्करसाठी नॉमिनेशन व्हावे यासाठी आम्ही अर्ज केला आहे. पण यावर अजून अंतिम निर्णय होणे बाकी आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट त्याच्या कथेमुळे जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो, याची आम्हाला खात्री आहे, असे विजय किरांगदुर म्हणाले. एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे नावसुद्धा ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते.

400 कोटींहून अधिकची केली कमाई
KGF नंतर 'कांतारा'ने कन्नड इंडस्ट्रीत नवा अध्याय लिहिला आहे. मूळ कन्नड भाषेत बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अवघ्या 18 कोटींमध्ये केलेल्या या चित्रपटाची कमाई पाहून चित्रपट जगतातील सर्व पंडित आणि समीक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.

IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट

ऋषभ शेट्टी स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसेच IMDb वर राज्य करत आहे. IMDb च्या यादीत कांतारा अव्वल स्थानावर आहे. 9.4 रेटिंग मिळवून सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट बनण्याचा विक्रम या चित्रपटाने केला आहे. यापूर्वी हा विक्रम KGF-2 च्या नावावर होता.

काय आहे 'कांतारा'ची कथा?
हा चित्रपट दैव कोला परंपरेवर आधारित आहे. 1847 च्या राजाला कुटुंब, संपत्ती आणि प्रजा असूनही कधीही शांत झोप लागत नव्हती, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. एका बाबाच्या सांगण्यावरून तो राजा दौऱ्यावर जातो आणि एका दगडासाठी त्या जंगलाची संपूर्ण जमीन पंजुरी दैववासीयांच्या स्वाधीन करतो. परंपरेनुसार, पुंजारी दैवातील लोक सर्व महत्त्वाचे निर्णय दैव नर्तकांच्या म्हणण्यानुसार घेतात. जेव्हा गावातील लोक दैवी नर्तकांच्या रूपात वेशभूषा करून नृत्य करतात तेव्हा देव त्यांच्या शरीरात प्रवेश करतो, अशी त्यांची धारणा असते. 1970 मध्ये, राजाचा एक वंशज आपली जमीन परत घेण्यासाठी येतो, तो दैव नर्तकांचा अपमान करतो. मुख्य दैव नर्तक जंगलातून गायब होतो, त्यानंतर त्याचा मुलगा काबुबेट्टी (ऋषभ शेट्टी) त्याची जमीन वन अधिकारी आणि त्या राजाच्या वंशजापासून वाचवतो.

30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता चित्रपट

ऋषभ शेट्टी स्टारर कांतारा 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटाची कमाई खूपच कमी होती, पण हळूहळू वर्ड ऑफ माउथमुळे चित्रपटाच्या कमाईने वेग पकडला. मूळ कन्नड भाषेत बनलेला हा चित्रपट निर्मात्यांनी 14 ऑक्टोबर रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज केला.

बातम्या आणखी आहेत...