आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

446 कोटी कमावणा-या 'कांतारा'ची 'तुंबाड'शी तुलना:21 वर्षांत बनला 'तुंबाड, 8 पैकी 3 फिल्मफेअर पुरस्कार पटकावले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कांतारा' या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अवघ्या 18 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 446 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाची 2018 मध्ये आलेल्या 'तुंबाड' या चित्रपटाशी सातत्याने तुलना केली जात आहे. 'तुंबाड'चे क्रिएटिव्ह डायरेक्टर आनंद गांधी यांनी मात्र 'कांतारा' चित्रपटाला 'तुंबाड'ची सर नसल्याचे म्हटले आहे. या दोन्ही चित्रपटांची तुलना करणाऱ्यांवर गांधी भडकले आहेत. त्यामुळे हा मुद्दा तापला आहे.

तेव्हापासून सोशल मीडियावर दोन्ही चित्रपटांच्या दोन वेगवेगळ्या गटांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. याशिवाय दोन्ही चित्रपटांच्या निर्मितीचा प्रवास खूप वेगळा आहे. 'कांतारा'ची निर्मिती 2021 पासून सुरू झाली, तर 'तुंबाड' हा चित्रपट तयार व्हायला 21 वर्षांचा कालावधी लागला.

'कांतारा'-'तुंबाड'च्या तुलनेदरम्यान, एक नजर टाकुया दोन्ही चित्रपटांवर आणि जाणून घेऊया दोन्ही चित्रपटांतील अंतर -

सर्वप्रथम जाणून घेऊया वादाची सुरुवात कशी झाली?

'कांतारा'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर अनेकांनी या चित्रपटाची तुलना 'तुंबाड' या चित्रपटाशी केली. दरम्यान 'तुंबाड'च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरने ट्वीट करत 'कांतारा'वर टीका केली. त्यांनी लिहिले, 'तुंबाड आणि कांतारा या चित्रपटांमध्ये काहीही साम्य नाही. भयपटाच्या माध्यमातून विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती हे लोकांसमोर आणणे, हा माझा तुंबाड चित्रपटाची निर्मिती करण्यामागील उद्देश्य होता. पण कांतारामध्ये या दोन्ही गोष्टींचा उदोउदो करण्यात आला आहे,' असे गांधी म्हणाले. गांधी यांच्या या ट्वीटवर चाहते टीका करत आहेत. 'कांतारा'ने आतापर्यंत 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला तर तुंबाडने त्याचा निम्माही व्यवसाय केला नाही, असे चाहते म्हणत आहेत.

'तुंबाड'च्या निर्मितीला लागली 21 वर्षे

दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी 1997 मध्ये या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू केले. त्यावेळी दिग्दर्शक फक्त 18 वर्षांचा होता. 2009-10 च्या दरम्यान अनिल यांनी सुमारे 700 पानांचा स्टोरीबोर्ड तयार केला. 1993 मध्ये अनिल यांच्या एका मित्राने त्यांना वाइल्डलाइफ सेंच्युरीची कहाणी सांगितली होती, जी ऐकून अनिल इतके घाबरले की, त्यांची पॅन्टही ओली झाली होती. या कल्पनेवर चित्रपट बनवण्याचा विचार त्यांनी केला होता. चित्रपटाचे शीर्षक 'तुंबाड' हे तुंबाड खोत या मराठी कादंबरीवरून घेण्यात आले आहे.

अनिल यांना 2008 मध्ये निर्माता शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. या चित्रपटासाठी त्यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीला मुख्य भूमिकेत साईन केले होते, परंतु जेव्हा त्या निर्मात्याने चित्रपट सोडला तेव्हा नवाज यांनीही चित्रपटातून काढता पाय घेतला होता. अशा परिस्थितीत 2012 मध्ये अनिल यांनी स्वत:च या चित्रपटासाठी फायनान्स केले.

अभिनेता सोहुम शाह विनायकच्या भूमिकेत होता. भूमिकेसाठी त्याने 8 किलो वजन वाढवले होते. सहा वर्षांत हा चित्रपट बनून तयार झाला. अशा परिस्थितीत सोहुमला सहा वर्षे वजन मेंटेन ठेवावे लागले होते.

जेव्हा हा चित्रपट तयार झाला तेव्हा दिग्दर्शक अनिल त्यावर समाधानी नव्हते. त्यांनी चित्रपट पुन्हा लिहिला आणि सुरवातीपासून पुन्हा शूट केला. अशा परिस्थितीत हा चित्रपट 2015 पर्यंत पूर्ण झाला.

हा चित्रपट 120 दिवसांत शूट करण्यात आला, तर गर्भातील हस्तरचे सीन कोणत्याही व्हीएफएक्सशिवाय तयार करण्यात आले.

'कांतारा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला होता ऋषभ शेट्टी

'कांतारा' बनवण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे चित्रपटाचे शूटिंग. दैव कोलाची भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीला रोज 50-60 किलो सामान घेऊन शूटिंग करावे लागत होते. दैव कोलाच्या पवित्र नृत्यामुळे ऋषभने मांसाहार सोडला आणि फक्त नारळ पाणी पिऊन संपूर्ण शूट केले. फायरस्टिक मारल्याने त्याची पाठ भाजली होती.

'कांतारा' - 'तुंबाड'च्या अचिव्हमेंट्स

कांतारा
हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी कन्नड भाषेत दक्षिणेत फक्त 800 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. कन्नडमध्ये हा चित्रपट गाजल्यानंतर तो हिंदी, तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात 2500 स्क्रीन्सवर तो हिंदीमध्ये रिलीज झाला. व्हिएतनाममध्ये रिलीज झालेला हा पहिला कन्नड चित्रपट आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 446 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, 'भेडिया', 'रामसेतू', 'थँक गॉड' यांसारखे मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु या सर्वांची कमाई 'कांतारा'पेक्षा कमी राहिली.

तुंबाड

'तुंबाडचा प्रीमियर व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. या महोत्सवात जाणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. शिवाय फिल्मफेअरमध्ये 8 श्रेणींमध्ये त्याला नामांकन मिळाले होते. त्यापैकी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइनसाठी चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. याशिवाय वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्समध्ये या चित्रपटाला सुमारे 18 पुरस्कार मिळाले.

काय आहे दोन्ही चित्रपटांची कथा?
'कांतारा'ची कहाणी -
हा चित्रपट दैव कोला परंपरेवर आधारित आहे. 1847 च्या राजाला कुटुंब, संपत्ती आणि प्रजा असूनही कधीही शांत झोप लागत नव्हती, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. एका बाबाच्या सांगण्यावरून तो राजा दौऱ्यावर जातो आणि एका दगडासाठी त्या जंगलाची संपूर्ण जमीन पंजुरी दैववासीयांच्या स्वाधीन करतो. परंपरेनुसार, पुंजारी दैवातील लोक सर्व महत्त्वाचे निर्णय दैव नर्तकांच्या म्हणण्यानुसार घेतात. जेव्हा गावातील लोक दैवी नर्तकांच्या रूपात वेशभूषा करून नृत्य करतात तेव्हा देव त्यांच्या शरीरात प्रवेश करतो, अशी त्यांची धारणा असते. 1970 मध्ये, राजाचा एक वंशज आपली जमीन परत घेण्यासाठी येतो, तो दैव नर्तकांचा अपमान करतो. मुख्य दैव नर्तक जंगलातून गायब होतो, त्यानंतर त्याचा मुलगा काबुबेट्टी (ऋषभ शेट्टी) त्याची जमीन वन अधिकारी आणि त्या राजाच्या वंशजापासून वाचवतो.

'तुंबाड'ची कहाणी - या चित्रपटाची कथा संपत्ती आणि सोन्याच्या देवावर आधारित आहे, जी 190 देवांना जन्म देते. त्याचा आवडता मुलगा हस्तर असतो, जो लोभाने सर्व पैसा आणि संपत्ती लुटतो. जेव्हा बाकीचे देव त्याच्यावर हल्ला करतात तेव्हा त्याची आई हस्तरला या अटीवर वाचवते की, त्याच्याकडे सोने असेल, परंतु त्याची कधीही पूजा केली जाणार नाही आणि त्याला अन्न मिळणार नाही. हस्तरला कायमचे तुंबाड गावात देवीचा गर्भ म्हटल्या जाणा-या गाभाऱ्यात कैद केले जाते.

1918 मध्ये तुंबाड गावात विनायक नावाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहतो तिथे त्यांच्या घरात एक वृद्ध स्त्री राहते. विनायक त्या बाईला घाबरतो, पण ती बाई हस्तरच्या नावाला घाबरते. आई विनायकला गावापासून दूर घेऊन जाते, पण तरुणपणात आर्थिक परिस्थितीला कंटाळलेला विनायक हस्तरच्या खजिन्याच्या शोधात तुंबाड गावात परततो. म्हातारी स्त्री तिला मुक्त करण्याच्या अटीवर खजिन्याचे रहस्य विनायकला सांगते. वचन दिल्याप्रमाणे, विनायक त्या स्त्रीला जाळतो आणि खजिन्याच्या शोधात निघतो.

हस्तरकडे सोने असते, पण अन्न नसते. याचा फायदा घेत विनायक अनेकदा गाभाऱ्यात जाऊन चतुराईने सोने आणतो. विनायक म्हातारा झाल्यावर हे रहस्य आपल्या मुलाला सांगतो. एके दिवशी मुलाच्या चुकीने विनायक हस्तरला स्पर्श करतो आणि शापित होतो. म्हणून तो आपल्या मुलाला त्याला जाळण्याची विनंती करतो.

बातम्या आणखी आहेत...