आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कश्मीर फाइल्स' वाद:विवेक अग्निहोत्रींच्या आरोपांवर कपिल शर्माने दिले स्पष्टीकरण, म्हणाले- एकतर्फी गोष्टींवर विश्वास ठेवू नका

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपिलच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली

कॉमेडियन कपिल शर्माने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्रींचे आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर एकतर्फी गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नये, असेही तो म्हणाला आहे. झाले असे की, दोन दिवसांपूर्वी विवेक यांनी कपिलवर 'द कश्मीर फाइल्स'च्या टीमला शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी आमंत्रित न केल्याचा आरोप केला होता. हे ऐकून त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत कपिलला ट्रोल करायला सुरुवात केली होती.

कपिलच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली
सोशल मीडियावर एका यूजरने कपिलवर आरोप करत प्रश्न केला आणि लिहिले की, "कपिल 'द कश्मीर फाइल्स'च्या प्रमोशन करायला का घाबरला आहे? विवेक रंजन अग्निहोत्री आणि त्यांच्या चित्रपटाची स्टारकास्टला तुम्ही आमंत्रित का केले नाही? तुम्हाला कशाची भीती होती.? मी तुमच्या खूप मोठा चाहता होतो, पण तुम्ही मला आणि इतर लाखो लोकांना निराश केले आहे. मी तुमच्यावर बहिष्कार टाकत आहे," अशा शब्दांत चाहत्याने आपली नाराजी व्यक्त केली.

कपिलने दिले स्पष्टीकरण
यावर कपिलने प्रत्युत्तर देताना लिहिले की, "राठोड सर हे खरे नाही. तुम्ही विचारले म्हणून सांगितले. इतर ज्या लोकांनी हेच सत्य स्वीकारले आहे, त्यांना समजावून सांगून काय उपयोग. एक अनुभवी सोशल मीडिया यूजर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आजच्या सोशल मीडियाच्या युगात एकतर्फी गोष्टींवर विश्वास ठेवू नये. धन्यवाद."

काय आहे संपूर्ण प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका नेटक-याने लिहिले की, 'विवेक सर तुम्ही तुमच्या चित्रपटाचे प्रमोशन कपिल शर्मा शोमध्ये करायला हवे. कपिल भाई तुम्ही सर्वाना सहकार्य केले आहे. कृपया या चित्रपटाला प्रमोट करा. आम्ही मिथुन दा आणि अनुपम खेर यांना एकत्र बघू इच्छितो.' याच्या उत्तरात विवेक यांनी लिहिले की, 'द कपिल शर्मा शोमध्ये कोणाला आमंत्रित करावे हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. जोपर्यंत बॉलfवूडचा संबंध आहे, एकदा मिस्टर बच्चन गांधी कुटुंबासाठी म्हणाले होते – 'वो राजा हैं हम रंक'. यानंतर आता या वादात सलमान खानचेही नाव पुढे आले आहे. कारण कपिल शर्मा शोचा निर्माता सलमान खान आहे.

आणखी एका नेटक-याने लिहिले, 'कपिल शर्माला तुमच्या शोमध्ये या चित्रपटाचा प्रोमो पाहायला आवडेल.' यावर उत्तर देताना विवेक म्हणाले की, 'त्यांनी आम्हाला शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. कारण आमच्या चित्रपटात बॉलिवूडमधील एकही मोठा कमर्शिअल स्टार नाही.'

द कश्मीर फाइल्स
'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या याबद्दल सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव, पृथ्वीराज सरनाईक दिसणार आहेत. हा चित्रपट 11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...