आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना मागील आठवड्यात फसवणुकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी कॉमेडियन कपिल शर्मा गुरुवारी मुंबई क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटिलिजन्स यूनिटच्या कार्यालयात पोहोचला होता. एपीआय सचिन वाजे यांच्यासमोर त्याचा जबाब नोंदवला जातोय. 2017 मध्ये दिलीप यांनी कपिलची व्हॅनिटी व्हॅन डिझाइन केली होती.
सीआययू कार्यालयात चौकशीसाठी पोहोचलेल्या कपिलने सांगितले की, "दिलीप छाब्रियांच्या अटकेनंतर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या निर्मितीवेळीदेखील काही तरी घोटाळा झाल्याचे त्याला समजले आहे. त्यानंतर त्याच्या वतीनेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.' आज याच प्रकरणाच्या चौकशीसाठी कपिल येथे आला आहे.
काय आहेत छाब्रियांवरचे आरोप?
डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना 28 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून 'DC अवंती' ही लक्झरी कारही जप्त करण्यात आली होती. छाब्रिया कथितरित्या कार फायनान्स आणि बनावट नोंदणी रॅकेटशी संबंधित आहेत. छाब्रिया यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप सध्या पोलिस कोठडीत आहे आणि आज त्यांची कोठडी संपत आहे.
छाब्रिया यांच्यावर आरोप आहे की, ते स्वतः डिझाइन केलेल्या गाड्या ग्राहक म्हणून खरेदी करायचे आणि त्या गाड्यांवर कर्ज घ्यायचे. छाब्रिया यांना फसवणुकीसह विविध आरोपांत अटक करण्यात आली.
अनेक सेलिब्रिटींच्या कार डिझाइन केल्या
छाब्रियांनी भारताच्या पहिल्या स्पोर्ट्स कारची रचना केली होती, विशेष म्हणजे दिलीप छाब्रिया हे कारला फ्यूचरिस्टिक मेकओव्हर देण्यासाठी प्रसिध्द आहेत आणि त्यांचे ग्राहक हे नामांकित व्यक्ती आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते शाहरुख खान पर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्याकडून लक्झरी गाड्या डिझाइन करुन घेतल्या आहेत. कारबरोबर ते सेलिब्रिटींच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅन देखील डिझाइन करतात. दिलीप छाब्रियांनी डिझाइन केलेल्या कार आणि व्हॅनिटी व्हॅनची किंमत जास्त असते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.