आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माचे स्वप्न साकारले:दीपिका पदुकोणसोबत 'मेगा ब्लॉकबस्टर'मध्ये झळकणार, 4 सप्टेंबरला प्रदर्शित होणार ट्रेलर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन कपिल शर्माची स्वप्नपूर्ती झालेली आहे. कपिलने गुरुवारी त्याचा आगामी प्रोजेक्ट 'मेगा ब्लॉकबस्टर'चे पोस्टर शेअर केले. या चित्रपटात कपिलला अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. दीपिकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे.

दीपिकाने पोस्टर शेअर करून चाहत्यांना दिले सरप्राइज
दीपिकाने मेगा ब्लॉकबस्टरमधील तिचा लूक उघड केला आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाचा सूटमध्ये दिसतेय. दीपिका ही कपिलची आवडती अभिनेत्री आहे. कपिल त्याच्या कॉमेडी शोमध्ये दीपिकासोबत फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडत नाही.

दीपिकाने मेगा ब्लॉकबस्टरमधील तिचा लूक शेअर केला आहे.
दीपिकाने मेगा ब्लॉकबस्टरमधील तिचा लूक शेअर केला आहे.

रश्मिका मंदानादेखील झळकणार
रश्मिका मंदाना आणि कपिल शर्मा यांनीही मेगा ब्लॉकबस्टरमधील त्यांचा लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये रश्मिका हात जोडलेली दिसतेय. तर कपिल जुन्या नायकाच्या लूकमध्ये दिसत आहे. तसेच त्याने रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. त्रिशा कृष्णन आणि कार्थी देखील मेगा ब्लॉकबस्टरचा एक भाग असणार आहेत.

दीपिका कपिलची आवडती अभिनेत्री आहे.
दीपिका कपिलची आवडती अभिनेत्री आहे.
मेगा ब्लॉकबस्टरमध्ये रश्मिका मंदाना देखील सामील झाली आहे.
मेगा ब्लॉकबस्टरमध्ये रश्मिका मंदाना देखील सामील झाली आहे.
'मेगा ब्लॉकबस्टर'मधील त्रिशा कृष्णनचा लूक आला समोर
'मेगा ब्लॉकबस्टर'मधील त्रिशा कृष्णनचा लूक आला समोर

रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांचाही समावेश
या सर्वांशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली हे देखील या प्रोजेक्टचा भाग आहेत. इतके स्टार्स एकाच फ्रेममध्ये बघण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असणार हे काही वेगळे सांगयला नको. 4 सप्टेंबरला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

क्रिकेटर रोहित शर्माचा बॉलिवूड डेब्यू प्रोजेक्ट.
क्रिकेटर रोहित शर्माचा बॉलिवूड डेब्यू प्रोजेक्ट.
सौरव गांगुलीचा ब्लॉकबस्टर अवतार
सौरव गांगुलीचा ब्लॉकबस्टर अवतार
बातम्या आणखी आहेत...